Jalgaon Crime News : गँगवार पद्धतीने गुन्हे करणारे अट्टल गुन्हेगार हद्दपार

Dikshant Sapkala and Ashutosh More
Dikshant Sapkala and Ashutosh Moreesakal

Jalgaon Crime News : गँगवार पद्धतीने वेगवेगळे गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन गुन्हेगारांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

आशुतोष ऊर्फ आशू सुरेश मोरे (वय २१, रा. एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी) आणि दीक्षांत ऊर्फ दादू देवीदास सपकाळे (वय १९, रा. यादव देवचंद हायस्कूलजवळ, मेहरूण) असे हद्दपार करण्यात आलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांचे नाव आहे. (Deportation of inveterate criminals commit gang war crimes jalgaon news)

जळगाव शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी दहशत पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी गँगवार पद्धतीने गुन्हे करणाऱ्या दोन्ही अट्टल गुन्हेगारांवर वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहे. त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

तरीदेखील त्यांच्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी, इम्रान सय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख आणि इम्तियाज खान या पथकाने गुन्हेगार आशुतोष मोरे आणि दीक्षांत सपकाळे या दोघांची गुन्हेगारी कुंडली आखून एकंदरीत हद्दपारीचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केला होता.

Dikshant Sapkala and Ashutosh More
Nashik Fraud Crime: ऑनलाइन सातबारा उताऱ्यामुळे भामट्याचा भांडाफोड; संशयिताकडे बनावट शेतकऱ्याचा पुरावा

जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी अहवालाचे अवलोकन करून दोघांना दोन वर्षांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.

पथकाने दोघांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे यांनी प्रस्ताव तयार करून दोघांना हद्दपारीपर्यंत पोचविले.

Dikshant Sapkala and Ashutosh More
Jalgaon Fraud Crime : जीवनसाथी ॲपच्या माध्यमातून महिला वनरक्षकाला गंडविले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com