Deputy Leader Sushma Andhare Statement : गद्दारो,ये पब्लिक है सब जानती है!

Pachora: Deputy leader Sushma Andhare speaking at a public meeting organized on the occasion of Mahaprabodhan Yatra. Vaishali Suryavanshi, Jayashree Mahajan, Kusum Patil, Gulabrao Wagh, Vishnu Bhangale, Deepak Singh Rajput, Sunil Patil, Sanjay Sawant, Harshal Mane and other officials and dignitaries on the platform
Pachora: Deputy leader Sushma Andhare speaking at a public meeting organized on the occasion of Mahaprabodhan Yatra. Vaishali Suryavanshi, Jayashree Mahajan, Kusum Patil, Gulabrao Wagh, Vishnu Bhangale, Deepak Singh Rajput, Sunil Patil, Sanjay Sawant, Harshal Mane and other officials and dignitaries on the platformesakal

पाचोरा : जिल्ह्यातील पाच आमदारांसह राज्यभरातील ४० आमदारांनी गद्दारी व विश्वासघात केला. आता वेगवेगळी कारणे सांगून आम्ही कसे खुद्दार आहोत, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न गद्दारांकडून केला जात आहे.

परंतु त्यांनी लक्षात घ्यावे की, गद्दारो ये पब्लिक है सब जानती है. वेळ येऊ द्या जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, अशा आशयाचे भावनिक प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रा. सुषमा अंधारे यांनी पाचोरा येथील जाहीर सभेत केले. महाप्रबोधन यात्रेनिमित्ताने आयोजित सभेत त्या बोलत होत्या.उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मानसिंगका मिल कॉर्नरच्या प्रांगणात बुधवार (ता. २) सायंकाळी सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन जाहीर सभा झाली.(Deputy Leader Sushma Andhare Taunting Statement against shinde group and also BJP Jalgaon Political News)

Pachora: Deputy leader Sushma Andhare speaking at a public meeting organized on the occasion of Mahaprabodhan Yatra. Vaishali Suryavanshi, Jayashree Mahajan, Kusum Patil, Gulabrao Wagh, Vishnu Bhangale, Deepak Singh Rajput, Sunil Patil, Sanjay Sawant, Harshal Mane and other officials and dignitaries on the platform
Sushma Andhare : मुक्ताईनगरात ठाकरे गटाला धक्का; सुषमा अंधारेंच्या सभेवर घातली बंदी

याप्रसंगी व्यासपीठावर जळगावच्या महापौर जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, कुसुम पाटील, गुलाबराव वाघ, ॲड. हर्षल माने, शरद कोळी (मुंबई) दीपकसिंग राजपूत, ॲड. अभय पाटील, शरद पाटील, उद्धव मराठे, रमेश बाफना, संपर्कप्रमुख सुनील पाटील, संजय सावंत, अजय पाटील, संदीप जैन, गणेश परदेशी, मनोहर चौधरी, शंकर मारवाडी, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, डॉ. योगेंद्रसिंह मौर्य, डॉ. सुरेश पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील, जिभाऊ पाटील, गणेश पाटील, राजेंद्र साळुंखे, दत्ता जडे, दादाभाऊ चौधरी, आनंद संघवी, राजेंद्र राणा, पप्पू जाधव आदी उपस्थित होते.

दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांसह राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सुषमा अंधारे यांना वैशाली सूर्यवंशी व संभाजी ब्रिगेडच्यावतीने बुद्ध प्रतिमा भेट देण्यात आली. प्रचंड गगनभेदी घोषणाबाजीत झालेल्या या जाहीर सभेत गुलाबराव वाघ, शरद कोळी, वैशाली सूर्यवंशी यांची भाषणे झाली. आपल्या अभ्यासू व जोशपूर्ण मनोगतात सुषमा अंधारे यांनी संदिपान भुमरे, रामदास कदम, किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरेंशी विश्वासघात करून शिंदे गटात गेलेल्या आमदारांचा खरपूस समाचार घेतला. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा मतदारसंघाची वैभवशाली व लोकाभिमुख नेतृत्वाची प्रतिमा संपुष्टात आणल्याचा आरोप केला.

Pachora: Deputy leader Sushma Andhare speaking at a public meeting organized on the occasion of Mahaprabodhan Yatra. Vaishali Suryavanshi, Jayashree Mahajan, Kusum Patil, Gulabrao Wagh, Vishnu Bhangale, Deepak Singh Rajput, Sunil Patil, Sanjay Sawant, Harshal Mane and other officials and dignitaries on the platform
Jalgaon Political Update : ठाकरे गटाच्या नेत्यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

जिल्ह्यात गुलाबराव देवकर, गुलाबराव वाघ, गुलाबराव पाटील हे तीन गुलाब असताना येथे कमळ फुललेच कसे? असा चिमटा ही काढला. पाचोरा पालिका हद्दीतील भूखंडांच्यासंदर्भात आरक्षण बदलवून मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत याचे सर्व पुरावे असल्याचे स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत सत्ता मिळवल्याने आम्ही बाहेर पडलो, असे सांगणाऱ्या आमदार किशोर पाटलांना पाचोरा पालिकेत राष्ट्रवादीशी सोबत कशी काय चालते? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. गद्दारांचा बुरखा फाडण्यासाठी आपण सोबत राहून सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन करून वैशाली सूर्यवंशी यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला. ॲड. अभय पाटील यांनी प्रास्ताविक केले. रतनकुमार थोरात यांनी सूत्रसंचलन केले. राजेंद्र राणा यांनी आभार मानले.

तात्यांचा फोटो लावला तर याद राखा...

आर. ओ. तात्यांनी आमदार किशोर पाटील यांना राजकीय वारसदार म्हणून त्यांना घडवले, मोठे केले पण तेच आर. ओ. तात्यांबद्दल जाहीर सभांमधून अपशब्द वापरतात. आणि दुसरीकडे तात्यांचे फोटो बॅनरवर लावतात. यापुढे माझ्या वडिलांचा (आर. ओ. तात्यांचा) फोटो लावला तर याद राखा, असा असे वैशाली सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

Pachora: Deputy leader Sushma Andhare speaking at a public meeting organized on the occasion of Mahaprabodhan Yatra. Vaishali Suryavanshi, Jayashree Mahajan, Kusum Patil, Gulabrao Wagh, Vishnu Bhangale, Deepak Singh Rajput, Sunil Patil, Sanjay Sawant, Harshal Mane and other officials and dignitaries on the platform
Jalgaon : नशिराबाद ग्रामस्थाची रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com