Latest Marathi News | नशिराबाद ग्रामस्थाची रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide Case

Jalgaon : नशिराबाद ग्रामस्थाची रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या

जळगाव : रेल्वेखाली झोकून देत चंद्रकांत रमेश माळी (वय ४१) यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास भादली रेल्वेस्थानकाजवळ घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे चंद्रकांत माळी वास्तव्यास असून, ते खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करीत होते.

बुधवारी दुपारी ते जेवण करून बाहेर गेले. दरम्यान, त्यांनी भादली रेल्वेस्थानकाजवळील अपलाइनवरील खांब क्रमांक ४२९/०२ गेट क्रमांक १५२ जवळ धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत मृत्यूला कवटाळले. (Nasirabad village committed suicide by throwing himself in front of train Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon : खडकदेवळ्यात बनावट पोटॅश खत प्रकरणी गुन्हा दाखल

लोकोपायलटने तत्काळ घटनेची माहिती रेल्वेस्थानक प्रबंधकांना दिली. त्यांच्या खबरीवरून नशिराबाद पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
स्टेशन प्रबंधकांनी घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना दिली. सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे व विनोद भोई यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. माळी यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

हेही वाचा: Jalgaon Crime News : 1 लाखासाठी विवाहितेचा छळप्रकरणी चाळीसगावात गुन्हा दाखल

टॅग्स :Jalgaonrailwaysucide case