
जयनगरच्या ‘त्या’ नाल्यावरील डिझाईन महापालिकेकडूनच प्राप्त
जळगाव : जयनगरमधील ‘त्या’ नाल्यावर टाकलेला ढापा अर्धवट नव्हे तर, महापालिकेने दिलेल्या डिझाईननुसारच टाकण्यात आला आहे, असा दावा मक्तेदाराने केला आहे.
या ठिकाणी असलेला खड्डा बुजविण्यासाठी तब्बल महिनाभरापासून पाठपुरावा केला मात्र महापालिकेकडून सहकार्य मिळाले नाही, असे नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी सांगितले आहे. (design on Jayanagar drain was received from NMC itself Jalgaon Latest Marathi News)
जयनगर येथील नाल्यावरील ढाप्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत महापालिकेतर्फे शुक्रवारी (ता. ५) काम सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणचा खड्डा बुजविण्यात आला आहे.
ढाप्याच्या कामाच्या तक्रारीबाबत मक्तेदार श्रीराम खटोड यांनी सांगितले की, ढापा अर्धवट टाकलेला नाही, तर महापालिकेच्या अभियंत्याने डिझाईनच त्या पद्धतीने दिले होते. त्यानुसार ते काम करण्यात आलेले आहे. त्यामुळे काम अर्धवट करण्याचा कोणताही संबंध नाही.
हेही वाचा: चंदुकाका सराफ अँड सन्सच्यावतीने सोन्याच्या खरेदीसाठी ‘E- Gold App’
कामासाठी पाठपुरावा : नगरसेवक जोशी
नगरसेवक बंटी जोशी यांनी सांगितले, की नाल्यावरचे काम गेल्या अनेक वर्षांपासून आहे, मात्र त्याकडे कुणीही लक्ष देत नव्हते. मात्र आपण स्वत: पाठपुरावा करून त्यावर ढापा टाकण्याचे काम महापालिकेत पाठपुरावा करून केले.
त्यानंतर या ठिकाणी असलेला खड्डा बुजवण्यासाठी जेसीबीची आवश्यकता होती, आपण त्यासाठी महापालिकेत पाठपुरावा करीत होतो, मात्र त्या ठिकाणी दोनच जेसीबी आहेत. त्यामुळे ते उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे त्याचे काम होवू शकले नाही.
आज जेसीबी मिळाल्यामुळे ते काम झाले. आपण नगरसेवक म्हणून वॉर्डात सकाळी सहा वाजेपासून फेरफटका मारून समस्या सोडवित असतो. तब्बल चार ते पाच तास आपण प्रभागासाठी देत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: 2 दिवसात साडेतेरा हजार तिरंग्याची विक्री; NMC कर्मचाऱ्यांना खरेदी बंधनकारक
Web Title: Design On Jayanagar Drain Was Received From Nmc Itself Jalgaon Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..