
चंदुकाका सराफ अँड सन्सच्यावतीने सोन्याच्या खरेदीसाठी ‘E- Gold App’
नाशिक : चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि. महाराष्ट्र आणि देशातील अग्रणी ज्वेलरी कंपनी असून आपल्या ग्राहकांना सुलभ पद्धतीने आणि नियमितपणे गुंतवणूक करता यावी यासाठी आम्ही सीएस इ-गोल्ड अॅप तयार केले आहे.
हे अॅप ग्राहकांच्या सोयीसाठी नुकतेच लाँच करण्यात आले आहे. सीएस इ-गोल्ड फॅसिलिटी युजर फ्रेंडली अॅप आहे. हे एक सोपे, सुरक्षित अॅप असून ग्राहक या अॅपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करू शकतील. (E Gold App for buying gold by Chandukaka Saraf Sons Nashik Latest Marathi News)
हेही वाचा: विभागीय आयुक्तांच्या फोटोचा Social Mediaवर गैरवापर; 4 दिवसात दुसरा गुन्हा दाखल
कोरोनाच्या भीषण रोगराईच्या काळात अनेकांनी डिजिटल गोल्डला प्राधान्य दिले. सोन्यातील गुंतवणूक ही कधीही फायदेशीर ठरते. वर्षानुवर्षे सोने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि.ची ही नवीन सुविधा ग्राहकांना पसंत पडेल, यात शंकाच नाही.
सीएस इ-गोल्ड युजर फ्रेंडली अॅप असून याद्वारे सहज सोन्याची खरेदी व विक्री करता येईल. या अॅपचा वापर करून इ-गोल्ड बुकिंग कुठेही आणि कधीही करता येईल. सोने खरेदी व विक्रीचा व्यवहार प्रचलित दराने होईल.
कमीत कमी बुकिंग ०.०२५ ग्रॅम पासून पुढे असेल आणि ९९.९ टक्के शुद्ध सोने बुक केले जाईल. या अॅपवर खरेदी केलेल्या सोन्याच्या शुद्धतेची हमी दिली जाईल. सोने खरेदीचे त्वरित बिल देखील पाठवले जाईल. अशा प्रकारे सीएस गोल्ड अॅप देईल ग्राहकांना सोने खरेदी आणि विक्रीचा सर्वात सुरक्षित तसेच आरामदायक पर्याय भविष्यात ठरणार आहे, असा विश्वास चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स प्रा. लि.यांचे वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा: MNS विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे इगतपुरीत जंगी स्वागत
Web Title: E Gold App For Buying Gold By Chandukaka Saraf Sons Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..