Dhonda month son-In-Laws gift
sakal
जळगाव - दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना यंदा येत्या १७ मेपासून सुरू होत आहे. तो १५ जूनपर्यंत राहणार आहे. या महिन्यात जावयाला सोने किंवा चांदीचा धोंडा, दागिना अथवा भेटवस्तू देण्याची परंपरा ग्रामीण भागात आजही मोठ्या उत्साहात पाळली जाते. यंदा सोन्या-चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. सोने व चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जावईबापूंना नेमका कोणता धोंडा द्यायचा?, असा प्रश्न सासरच्या मंडळींना पडला आहे.