धुळे : तस्कर जातीच्या सात सापांचा जन्म

धुळ्यातील सर्पमित्र ओम बडगुजर यांचा ‘सर्प वाचवा’चा कृतियुक्त संदेश
तस्कर जातीच्या सात सापांचा जन्म
तस्कर जातीच्या सात सापांचा जन्मsakal

कापडणे : साप, सर्प, नाग अशी नावे ऐकल्याबरोबर भयभीत होणारे, प्रत्यक्ष बघितल्यावर थरकाप झालेले अन् घरात साप शिरलाय, असे समजल्यावर भल्याभल्यांची बोबडी वळते. पण धुळे शहरातील सर्पमित्र ओम बडगुजर यांच्या घरी तस्कर जातीच्या सात सापांनी जन्म घेतला.

त्यासाठी दोन दिवस परिपक्व असलेल्या अंड्यांची बडगुजर यांनी पोटच्या मायेने काळजी घेतली. या युवा सर्पमित्राने सातही पिलांना लळींग कुरणात निसर्गाच्या सान्निध्यात सोडून ‘सर्प वाचवा- निसर्ग वाचवा’चा कृतियुक्त संदेश दिला. शहरातील सर्पमित्र यश मराठे यांना दोन दिवसांपूर्वी अग्रवालनगर परिसरात साप निघाल्याचा दूरध्वनी आला. मराठे व ओम बडगुजर या सर्पमित्रांनी त्याठिकाणी जाऊन शोध घेतला. तिथे साप आढळला नाही.

तस्कर जातीच्या सात सापांचा जन्म
भारत-पाक मॅच बघायला गेलेल्या गृहमंत्र्यांना पाकने बोलावलं मायदेशी

मात्र बारकाईने तपासणी केली असता, बिनविषारी तस्कर जातीच्या सापांची ११ अंडी आढळली. अंड्यांच्या परिसरात मादी साप आढळला नाही. अंडी परिपक्क असल्याचे निदर्शनास आल्याने सर्पमित्र बडगुजर यांनी घरी त्याची काळजी घेतली. ११ अंड्यांपैकी सात अंड्यांमधून लहान तस्कर जातीच्या पिलांनी जन्म घेतला. चार अंडी आधीच खराब झालेली होती. बडगुजर यांनी अंड्यांची काळजी घेणे व पिलांचा जन्म घेतानाचा अनुभव घेतला. सर्पमित्र मराठे आणि बडगुजर यांनी सापाच्या सातही पिलांना लळींग कुरणात सोडले. त्यांना ज्येष्ठ सर्पमित्र निर्भय साखला व नरेश सोनार यांनी मार्गदर्शन केले.

त्या पिलांची नैसर्गिक वाढ होईल. ती पिले मोठी झाल्यावर तपकिरी शेवाळी रंगाचे असतील. अंगावर फिकट आडवे पट्टे, शरीरावर चमकदार खवले व मानेवर दोन गडद तपकिरी किंवा काळ्या रेषा असतील. बुद्धिबळाच्या पटासारखी त्यांची त्वचा असते. तस्करी ही बिनविषारी जात आहे.

- ओम बडगुजर, सर्पमित्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com