जळगाव : दिशादर्शक फलकांमुळे अडचण अन्‌ संभ्रमही

शहरातील महामार्गावरील प्रकार; ‘न्हाई’चा अजब कारभार
Difficulty and confusion due to directional signs
Difficulty and confusion due to directional signssakal
Updated on

जळगाव : अगदी सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेल्या जळगाव शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील अजब प्रकार काम संपण्याच्या टप्प्यात असतानाही सुरूच आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावर लावलेले दिशादर्शक फलक नागरिकांसाठी सुविधेऐवजी अडचणीचे ठरत आहेत. तर काही ठिकाणचे फलक संभ्रम वाढविणारे आहेत.

Difficulty and confusion due to directional signs
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांचा 'पद्मभूषण' स्विकारण्यास नकार

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर खोटेनगर ते कालिंकामाता चौक या सुमारे सात किलोमीटरच्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. किरकोळ भाग वगळता हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काम पूर्ण होण्याच्या टप्प्यात आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) महामार्गावर व जोड रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावले आहेत. वाहनधारकांच्या सुविधेसाठी खरेतर हे दिशादर्शक फलक आवश्‍यक असतात. मात्र, ‘न्हाई’ने लावलेल्या या फलकांमुळे काही ठिकाणी नागरिकांची अडचण होतेय, तर काही ठिकाणी हे फलक संभ्रम निर्माण करताना दिसताय.

Difficulty and confusion due to directional signs
Punjab Election 2022 : माजी उपमुख्यमंत्री बादल यांचे मुख्यमंत्री चन्नी यांना आव्हान

आकाशवाणीच्या पथमार्गावर फलक

आकाशवाणी चौकातही ‘न्हाई’ने चारही दिशांच्या दृष्टीने मोठा दिशादर्शक फलक लावला आहे. या फलकावर त्या- त्या ठिकाणांची दिशा तर बरोबर दर्शवली आहे, मात्र हा फलक जिल्हा माहिती कार्यालय व आकाशवाणीच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या पथमार्गावर (फुटपाथ) लावण्यात आला आहे, त्यामुळे या पथमार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांची अडचण होतेय. याशिवाय, प्रभात चौकात मु. जे. महाविद्यालयाच्या बाजूनेही एक फलक लावण्यात आला असून त्यावर नागपूरसाठी दिशा दर्शविण्यात आली आहे. परंतु, मु. जे. महाविद्यालय परिसरातून येणाऱ्या वाहनधारकांना नागपूरची दिशा दर्शविणारा फलक काय कामाचा? दिशादर्शक फलक वाहनधारक व नागरिकांच्या सुविधेसाठी असतात. मात्र, ‘न्हाई’चे हे फलक संभ्रम वाढविणारे व अडचण निर्माण करणारे ठरताय. आधीच सर्कल, भुयारी मार्गांच्या तांत्रिक दोषांमुळे महामार्गाचे काम वादग्रस्त ठरलेय, त्यात आता या दिशादर्शकांनी भर घातल्याचे सध्यातरी दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com