Digital India Week : डिजिटल इंडिया सप्ताह 25 जुलैपासून; या संकेतस्थळावर करा नोंदणी

Digital India Week from 25th July in jalgaon news
Digital India Week from 25th July in jalgaon newsesakal

Digital India Week : भारत सरकारतर्फे २५ ते ३१ जुलैदरम्यान ‘डिजिटल इंडिया’ सप्ताह होणार आहे. यात सर्वच नागरिकांना ई-गर्व्हनन्स सेवांची माहिती मिळेल. (Digital India Week from 25th July in jalgaon news)

आपल्या दैनंदिन जीवनात माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यासाठी हा सप्ताह सुरू होत असून, नागरिकांनी नोंदणी केल्यास त्यांना त्यांच्या ई- मेलवर मेसेज येईल, अशी माहिती ‘एनआयसी’चे वरिष्ठ संचालक प्रवीण चोपडे यांनी दिली.

डिजिटल इंडिया’ सप्ताह भारताचे तंत्रज्ञान जगासमोर दाखविणे, टेक स्टार्टॲपसाठी सहयोग व व्यवसायाच्या संधी शोधणे, पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Digital India Week from 25th July in jalgaon news
Digital Beggar : सुट्टे पैसे नको, QR स्कॅन करा; मुंबईतील 'डिजिटल' भिकाऱ्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

नागरिकांना ई-गर्व्हनन्स सेवांबद्दलची माहिती देण्यासाठी व त्यांनी आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी आहे. राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांची मालिका आयोजित केली जाईल. नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी गरजेची आहे.

त्यासाठी jalgaon.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे किंवा http:/www.nic.in/diw2023-reg/ या लिंकचा वापर नोंदणीसाठी करावा. अधिकाधिक नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन श्री. चोपडे यांनी केले आहे.

Digital India Week from 25th July in jalgaon news
Digital Post Office: स्वातंत्र्यदिनी डिजिटल टपाल कक्ष होणार कार्यान्वित! महसूल कार्यालयात मिळणार हायटेक सेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com