Jalgaon News : बोदवडला टेंडरवरून नगरसेवकांमध्ये राडा; दोन्ही गटाकडून तुंबळ हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dispute between corporators over  tender Both groups clashed jalgaon news

Jalgaon News : बोदवडला टेंडरवरून नगरसेवकांमध्ये राडा; दोन्ही गटाकडून तुंबळ हाणामारी

बोदवड (जि. जळगाव) : येथील नगरपंचायतीमध्ये दीड वर्षापूर्वी नगरसेवकांमध्ये टेंडरवरून झालेल्या घटनेची आज पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले.

नगरपंचायतीच्या एका दालनात दुपारी तीनच्या सुमारास दोन नगरसेवकांमध्ये टेंडरवरून (tender) वाद उफाळून आला. (dispute between corporators over tender Both groups clashed jalgaon news)

काही वेळात वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. नगरपंचायत सभागृहात नगरसेवक हाजी सईद बागवान व स्वीकृत नगरसेवक दीपक झांबड यांच्यामध्ये खडाजंगी झाली. जुने टेंडर व नवीन दहा लाख रकमेवरील ऑफलाइन टेंडरवरून असलेला वाद हाणामारीमध्ये रुपांतरीत झाला.

यानंतर इतर नगरसेवकांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. नगरपंचायतीत वातावरण शांतता होत असतानाच पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर नगरसेवक दीपक झांबड यांना पोलिसांनी पोलिस वाहनात बसण्याची विनंती केली, पण नगरसेवक झांबड हे गाडीत बसले नाही.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

ते मोटारसायकलने आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन घराकडे जात असताना घराजवळील मोठ्या मशिदीजवळ त्यांच्या दिशेने कुणीतरी वीट मारून फेकली आणि अचानक हाणामारीत रूपांतर झाले. हे सर्व घडल्यानंतर इथेही इतर नगरसेवकांकडून समजूत घालत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर दोन्ही गटाची मंडळी पोलिस ठाण्यापर्यंत गेली.

यानंतर गावातील काही राजकीय मंडळी व इतर सामाजिक मंडळी यांच्या मध्यस्थीने गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी जवळपास दोन-तीन तास प्रयत्न झाले. यानंतर दोन्ही नगरसेवकांमध्ये समेट घडवून आला.

त्यानंतर पोलिस ठाण्यातून गळ्यात गळा घालून दोन्ही नगरसेवक बाहेर निघाले. यामुळे बोदवड शहरांत शांततेचे वातावरण निर्माण झाले. काही मंडळी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु दोन्ही गटांत सिमेट घडवून आल्याने शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :JalgaoncrimeBeatingTender