
Jalgaon News : वळण रस्त्यांसाठी साडेनऊ कोटी मंजूर; जळगाव चाळीसगाव दरम्यान होणार कामे
भडगाव (जि. जळगाव) : गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था असलेला जळगाव ते चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वरील वळण रस्त्यांच्या (Road) दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर होता.
याबाबत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रास्तो रोको आंदोलनही केले होते. (Nine and half crore sanctioned for turning roads between Chalisgaon jalgaon news)
याबाबत खासदार उन्मेेष पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर वळण रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी साडेनऊ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता मंदावलेला महामार्गाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
सदार उन्मेश पाटील यांच्याकडे अनेक प्रवाशांच्या तक्रारी आल्या होत्या. आज अखेर खासदार उन्मेेष पाटील यांच्या प्रयत्नातून या महामार्गावरील सुमारे १२ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी वीस लाखांचा निधी मंजूर झाल्याने या रस्त्याचा वनवास संपला आहे.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
या निधीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून तातडीने निधी मंजूर करण्यात आला आहे. लागलीच या महामार्गाची दुरुस्तीला प्रारंभ होणार असून, प्रवाश्यांचे होणारे हाल थांबून, अपघात कमी होऊन वाहनधारकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती खासदार उन्मेेष पाटील यांनी नवी दिल्ली येथून दिली आहे.
"जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्ग झाला. मात्र जमीन अधिग्रहणामुळे वळण रस्त्यांचे काम रखडले आहे. त्यामुळेच महामार्ग असूनही वाहतुकीचा वेग मंदावलाय. त्यामुळे मी खास बाब म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. लवकरच हे काम प्रत्यक्षात सुरू होईल." - उन्मेेष पाटील, खासदार, जळगाव