जळगाव : तालुक्यात 40 हजार रेशन कार्डांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tahsildar Namdevrao Patil

जळगाव : तालुक्यात 40 हजार रेशन कार्डांचे वाटप

जळगाव : आधी रेशन कार्ड (Ration Card) घेण्यासाठी तहसिल कार्यालयात गेले म्हणजे एजंटाशिवाय रेशन कार्ड मिळतच नाही. वजन ठेवूनही अनेक महिने कार्ड मिळत नसल्याचे चित्र होते. जळगावचे तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ४० हजार गरजूंना रेशन कार्ड देवून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. गरजूंना रेशन दुकानावरील स्वस्त दरात मिळणारे धान्य महागाईच्या युगात मोठा आधार ठरते. अशा गरजूंना अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर धान्य (Grains) मिळाल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. (Distribution of 40 thousand ration cards in a year by tahsildar namdev patil Jalgaon News)

कोरोना महामारीने गरिबांना अधिकच गरीब केले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अद्यापही अनेकांना नोकऱ्या, रोजगार नसल्याचे चित्र आहे. अशावेळी रेशन कार्डावर मिळणाऱ्या अल्पदरातील धान्याचा मोठा आधार सर्वसामान्य, गरीब कुटुंबीयांना होतो. पूर्वी २०१९ मध्येच मंजूर असलेल्या शिधापत्रिका धारकांना प्राधान्य कुटुंबाचा लाभ देण्याचा, अंत्योदयमधील लाभार्थी निवडण्याचा निर्णय शासनाचा होता. यामुळे अनेक गरजू रेशन दुकानावरील धान्यापासून वंचित राहत होते. शासनाने वर्षभरापूर्वी परिपत्रक काढून २०१९ मध्येच मंजूर रेशन कार्डधारकांना लाभ देण्याची अट रद्द केल्याने नवीन गरजूंना रेशन कार्ड देवून धान्याचा लाभ देता आला आहे. तृतीय पंथी नागरिक, दुर्धर आजाराने त्रस्त व्यक्ती, विधवा, परितक्त्या, मोल मजुरी करून पोट भरणारे गरजू अशांना तहसिलदार पाटील यांनी रेशन कार्ड दिले आहेत.

ग्रामीण भागासाठी ४४ हजार वार्षिक उत्पन्न, शहरी भागासाठी ५९ हजार वार्षिक उत्पन्न असलेले, सोबतच दिव्यांग, दुर्धर आजार, मोलमजुरी करणारे, तृतीय पंथीय असल्याचा परावा दिलेल्यांना हे कार्ड देण्यात आले आहे. त्यात प्राधान्य कुटुंबातील ३९ हजार ७९३, अंत्योद्यमधील २२ कार्डाचा सामावेश आहे.

हेही वाचा: मतदार याद्या प्रसिध्दीकडे लक्ष; अंतिम यादी 7 जुलैला

रेशन कार्ड प्रकार-कार्ड संख्या--सदस्य संख्या --गहू--तांदूळ (किलो)

प्राधान्य--६४ हजार १४१--२ लाख ८२ हजार २३२--३--२

अंत्योदय--१२ हजार ८५१--५२ हजार ८६४--२५--१०

हेही वाचा: जुलैपासून डास आढळणाऱ्या घरांना दंड; साथ रोग प्रतिबंधाची तयारी

"दिव्यांग, तृतीय पंथी, दुर्धर आजाराने ग्रस्त, गरजुंनी रेशन कार्ड, स्वस्त धान्यासाठी अर्ज केले होते. त्याची लागलीच चौकशी करून जागेवरच त्यांना रेशन कार्ड देवून, धान्यही देण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने रेशन कार्डाचा लाभ देण्याच्या वर्षाची अट रद्द केल्याने ४० हजार नवीन रेशन कार्ड दिले आहेत." - तहसिलदार नामदेव पाटील.

Web Title: Distribution Of 40 Thousand Ration Cards In A Year By Tahsildar Namdev Patil Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top