मतदार याद्या प्रसिध्दीकडे लक्ष; अंतिम यादी 7 जुलैला

NMC Nashik
NMC Nashikesakal

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशाप्रमाणे प्रशासनाला प्रारूप मतदार यादी (Voters List) प्रसिद्धीचे वेध लागले आहेत. मात्र, संबंधित मतदार याद्या यादी ऑनलाइन (Online) की विभागीय कार्यालयांच्या फलकांवर जाहीर करायच्या याविषयी स्पष्ट निर्देश नसल्याने प्रशासनासोबत इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था आहे. (Municipal general election voter list publicity Final list on July 7 Nashik News)

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासकीय तयारी जोरात सुरू आहे. नव्या रचनेत यंदाच्या निवडणुकीतून महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढणार असून, १२२ ऐवजी १३३ नगरसेवक नाशिककर मतदार निवडणार आहेत. या वाढीव अकरा जागांसह सर्वच जागांकरिता इच्छुकांची तयारी सध्या सुरू आहे. त्याचबरोबर प्रभागांची संख्याही ४४ वर गेली आहे. त्यासाठी येत्या १७ जूनला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठीची प्रशासनाची तयारी सुरू आहे. सुमारे एक हजार मतदार याद्यांत बारा लाख मतदारांच्या नावाचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या प्रभागरचनेनुसार प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द ठरवत राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले.

NMC Nashik
Nashik : शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्‍या; काहींकडून स्‍वागताची तयारी

नंतरच्या आयोगाने प्रक्रिया राबविताना गेल्या १७ मेस अंतिम प्रभागरचना जाहीर केली. निवडणूक कार्यक्रमाला गती मिळाली आहे. पुढील टप्यांत महिला आरक्षण सोडत जाहीर होऊन यामध्ये १३३ पैकी तब्बल ६७ जागांवर महिलांसाठी आरक्षण काढले गेले. प्रक्रियेतील पुढील टप्यांत येत्या १७ जूनला निवडणूक आयोगाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील तयारी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, ही मतदार यादी कशा पद्धतीने जाहीर करायची याबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना महापालिका प्रशासनाला मिळाल्या नसल्याने प्रशासनासह इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे. प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचनांवर आवश्यक ती प्रक्रिया राबविल्यानंतर ७ जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

NMC Nashik
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बस सुरू करा हो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com