Maharashtra Chitrarath: प्रजासत्ताक दिनाची जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

Republic Day
Republic Dayesakal

जळगाव : भारताच्या प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीस आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस दलाची प्रजासत्ताक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहण २६ जानेवारीस सकाळी सव्वानऊला पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. (District administration police force maharashtra chitrarath Republic Day preparation reached final stage jalgaon news)

पोलिस कवायतीचे संचलन, विविध शासकीय विभागांतर्फे जनजागृतीपर चित्ररथ पथसंचालनात असतील. सोबत विविध शाळा, महाविद्यालयांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बैठक घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या तयारीचा आढावा घेतला.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Republic Day
Bahinabai Mahotsav: बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी समारोप; महोत्सवात कोटीची उलाढाल

निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, तहसीलदार सुरेश थोरात, एनसीसी विभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी, शिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी सव्वानऊला असल्याने शाळा, महाविद्यालये व इतरांना त्यांचे ध्वजारोहण सकाळी साडेआठपूर्वी किंवा दहानंतर करावे, जेणेकरून सर्वांना मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात हजर राहता येईल, अशा सूचना देण्यात आल्या.

Republic Day
Balasaheb Thackeray Jayanti: प्रतिमापूजनावरून ठाकरे, शिंदे गटात धुसफूस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com