Latest Marathi News | जिल्हा दूध संघ निवडणूक 20 डिसेंबरनंतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District Milk Union

Jalgaon News : जिल्हा दूध संघ निवडणूक 20 डिसेंबरनंतर

जळगाव : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच सहकारी संस्थांच्याही निवडणुका आहेत. दोन्हीचे कार्यक्षेत्र ग्रामीण भाग असल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील न्यायालयीन आदेशानुसार निवडणुका होत असलेल्या सहकारी संस्था वगळून ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करून २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

त्यानंतर आहे त्या टप्प्यावर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामुळे आता जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित झाली असून २० डिसेंबरनंतर प्रक्रियेला पुन्हा प्रारंभ होईल.

राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागातर्फे राज्याचे विशेष कार्यकारी अधिकारी, सहनिबंधक सहकारी संस्था यांनी आज (ता.२९) हे आदेश जारी केलेत. या आदेशात त्यांनी म्हटले आहे, की राज्यातील ७७५१ ग्रामंपचायतीचा निवडणूक कार्यक्रम १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत जाहीर करण्यात आला आहे. (District Milk Union Election After 20th December Jalgaon News)

तसेच राज्यातील ७१४७ सहकारी संस्थाचा निवडणूक कार्यक्रम देखील सुरू करण्यात आला आहे. यात ‘अ’ वर्ग ३८, ‘ब’ वर्ग ११७०, ‘क’ वर्ग ३१५१ व ‘ड’ वर्गातील २७८८ संस्था आहेत.

सहकारी संस्था निवडणुका पुढे

ग्रामपंचायत व सहकारी संस्था निवडणुका एकाच वेळी आहेत. दोन्हीचे क्षेत्र ग्रामीण आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही क्षेत्रातील बरेचशे मतदार हे ग्रामीण भागातील असल्याने ते मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दोन्ही निवडणुकीत मतदारांना सहभाग नोंदविता यावा यासाठी शासनाच्या अधिकारात राज्यातील ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहे.

२० डिसेंबरनंतर प्रक्रिया

अध्यादेश जारी झालेल्या तारखेपासून आहे, त्या टण्यावर निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहे. २० डिसेंबर २०२२ नंतर आहे, त्या टप्प्यापासून ही निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येईल. जळगाव जिल्हा दूध संघ संचालकपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया चिन्हापर्यंत आलेली आहे. उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली आहेत. यापुढे मतदानाची प्रक्रिया. २० डिसेंबरनंतर पुढे ही प्रक्रिया सुर करण्यात येईल.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

"शासनाने आज जारी केलेल्या अध्यादेशानुसार जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २० डिसेंबर नंतर शासन आदेश आल्यानंतर निवडणूक चिन्ह जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेपर्यंत जेवढे दिवस आहेत, तेवढ्या दिवसाचा कालावधी ठेवून निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात येईल."

संतोष बिडवई, निवडणूक निर्णय अधिकारी,

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ संचालक निवडणूक

टॅग्स :Jalgaonelection 2022