Jalgaon Crime News : पारोळ्यातील आरोपीस एक वर्षाची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon Crime News : पारोळ्यातील आरोपीस एक वर्षाची शिक्षा

अमळनेर (जि. जळगाव) : पारोळा तहसील कार्यालयातील पुरवठा लिपिकाची कॉलर पकडून गोंधळ घातल्याप्रकरणी अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने (Court) आरोपीस एक वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. (District Sessions Court has sentenced accused to 1 year imprisonment case of grabbing supply clerk collar jalgaon news)

लिपिक सुदाम शेनपडू भालेराव हे कार्यालयीन कामकाज करत असताना आरोपी अनिल गंगाराम पाटील (रा. सुमठाणे, ता. पारोळा) याने लिपिक भालेराव यांना सेतू सुविधा केंद्राची पावती दाखवून माझे काम आजच्या आज का केले नाही म्हणून आरोळ्या मारून गोंधळ घातला

व तुझी अँटिकरप्शन विभागाकडे खोटी तक्रार करून तुला अडकवतो, असे म्हणत त्याने लिपिकाच्या टेबलावरील स्वस्त धान्य दुकानाचे रजिस्टर टेबलावरून खाली फेकले व फिर्यादी भालेराव यांच्या अंगावर धावत येऊन शर्टाची कॉलर पकडली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी २ मार्चला गुन्हा दाखल झाला होता. याबाबत अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता. यावेळी सरकारी वकील किशोर बागूल यांनी सहा साक्षीदार तपासले.

त्यात तामसवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार शरद वाणी व फिर्यादीसह पुरवठा कर्मचाऱ्यांची साक्ष ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्या. एस. बी. गायधनी यांनी आरोपी अनिल गंगाराम पाटील यास भादंवि कलम ३५३ प्रमाणे एक वर्ष शिक्षा व ५०० रुपये दंड तर कलम ५०६ प्रमाणे एक वर्ष शिक्षा व ५०० रुपये दंड तर दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा असा निकाल दिला. या वेळी पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार उदयसिंह साळुंखे व हिरालाल पाटील यांनी मदत केली.

टॅग्स :JalgaoncrimeCourt