Latest Marathi News | आजपासून दीपोत्सव प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी जळगावकर सज्ज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival 2022 :

Diwali Festival : आजपासून दीपोत्सव प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी जळगावकर सज्ज!

जळगाव : आश्विन वद्य एकादशीपासून पाच दिवसांच्या प्रकाशपर्वाला उत्साहात सुरवात होत असून, घराघरांत फराळाचे पदार्थ तयार करण्याचे काम सुरू होते. विशेषकरून लहान मुले, महिला वर्गात उत्साहाचे वातावरण असून, खरेदीसाठी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.

शुक्रवार (ता. २१) : आश्विन वद्य एकादशी (रमा एकादशी)

दीपोत्सवाच्या प्रारंभी येणारी ही एकादशी म्हणजे रमा एकादशी. रमा म्हणजे लक्ष्मी. समुद्रमंथनातून पहिले रत्न निघाले ते म्हणजे लक्ष्मी. म्हणूनच या दिवशी कार्तिक स्नानानंतर लक्ष्मीची पूजा करून उपवास केला जातो.

रमा एकादशी

रमा एकादशी

हेही वाचा: Diwali MSRTC Fare Hike : दिवाळीत STला भाडेवाढीचा चटका!

शुक्रवार (ता. २१) : वसूबारस (गोवत्स द्वादशी)

समुद्रमंथनातून नंदा नावाची कामधेनू गाय निघाली. या दिवशी वासरू असलेली गाय (सवत्स गाय) यांची पूजा करून नैवेद्य देतात.

वसूबारस (गोवत्स द्वादशी)

वसूबारस (गोवत्स द्वादशी)

हेही वाचा: Jalgaon Crime News : 30 हजारांच्या उसनवारीपोटी मागितली 5 लाखांची खंडणी

शनिवार (ता. २२) : धनत्रयोदशी (अभ्यंगस्नान)

धनत्रयोदशीनिमित्त सायंकाळी दागदागिने, द्रव्य, गणेश, विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग आणि द्रव्यनिधी आदींचे पूजन करून नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. या दिवशी सायंकाळी घरोघरी धनलक्ष्मीचे पूजन करतात. व्यापारीवर्गात ‘धनतेरस’ या नावाने धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर वैद्यकीय सेवेतील तज्ज्ञ, विशेषत: आयुर्वेदात या दिवशी धन्वंतरी पूजन करण्याचे महत्त्व सांगितले आहे. महाराष्ट्रातील काही भागांत अक्षांश व रेखांशानुसार रविवारी (ता. २३) धनत्रयोदशी साजरी होणार आहे.

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी

हेही वाचा: MLA Kishor Patil Statement : मंत्रीपदाचे काय घेऊन बसलात,मी स्वतःला मुख्यमंत्री समजतो

सोमवार (ता. २४) : नरक चतुर्दशी (अभ्यंगस्नान)

नरक चतुदर्शीला नरकासुराच्या वधाची आख्यायिका सांगितली जाते. समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश या अर्थाने ही गोष्ट सांगितली जाते.

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी

हेही वाचा: Diwali MSRTC Fare Hike : दिवाळीत STला भाडेवाढीचा चटका!

सोमवार (ता. २४, अमावस्या), लक्ष्मीपूजन (अभ्यंगस्नान) (मुहूर्त सायंकाळी ६.०४ ते रात्री ८.३४)

लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीपूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मूल्य शब्दातीत आहे. लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसून ती ‘श्री’ या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, आरोग्य, समृद्धी, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य अशा सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे. व्यापारी वर्गात या दिवशी वहीपूजनाला महत्त्व आहे.

लक्ष्मीपूजन (अभ्यंगस्नान)

लक्ष्मीपूजन (अभ्यंगस्नान)

हेही वाचा: Jalgaon Crime News : ‘महिला गँग’ ने डॉक्टरला Honey Trapमध्ये गुंतवले

बुधवार (ता. २६) बलिप्रतिपदा/दीपावली पाडवा (अभ्यंगस्नान)

साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त. गोवर्धन पूजा (गोठा करणे). तसेच बळीच्या पूजनाचा, पर्यायाने धनधान्य पूजनाचा हा दिवस.

भाऊबीज (यमाद्वितीया). या दिवशी बहीण भावाला ओवाळते. दिवाळी सणातील हा अखेरचा दिवस. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य, महतीचा संदेश देणाऱ्या या सणाने दीपोत्सवाची सांगता होते.

बलिप्रतिपदा/दीपावली पाडवा

बलिप्रतिपदा/दीपावली पाडवा

हेही वाचा: Jalgaon : अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी वारसदांराचा तीव्र संताप!