Navratri 2023 : आफ्रिकेच्या डिजेम्बे वाद्याची भुसावळकरांना भुरळ; नागरिकांनी घेतला वाद्य वाजविण्याचा आनंद

वाद्य वाजविण्याचा आनंद घेताना आमदार संजय सावकारे शेजारी राजीव शर्मा, डॉ. राजेश पाटील व भुसावळकर.
Navratri 2023 : आफ्रिकेच्या डिजेम्बे वाद्याची भुसावळकरांना भुरळ; नागरिकांनी घेतला वाद्य वाजविण्याचा आनंद

Navratri 2023 : येथे रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आयोजित दांडियात दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध असलेले डिजेम्बे वाद्य वाजविण्याचा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला. विशेष म्हणजे हे वाद्य वाजविण्याचा आनंद आमदार संजय सावकारे यांच्यासह ५६० भुसावळकरांनी घेतला.

पुणे येथील कपिल छाजेड यांची टिम धुन यांनी यासाठी पुढाकार घेतला. सध्या नवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी दांडियाचे कार्यक्रम सुरू आहेत. येथील बियाणी स्कुलच्या मैदानावर ओबेनॉल फाऊंडेशन प्रायोजित रोटरी रेल सिटी व इनरव्हील रेल सिटी क्लब तर्फे दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. (djembe famous African instrument was played at navratri jalgaon news)

यावेळी पुण्याच्या टीम धुनने यावेळी भुसावळकर यांना दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध डिजेम्ब वाद्य वाजविण्याची संधी उपलब्ध करून दिली. टीम धूनचे कपिल छाजेड व त्यांची टिम वाद्य वाजविण्याचे मार्गदर्शन नागरिकांना केले.

प्रशिक्षकांप्रमाणे उपस्थित श्रोते हे वाद्य वाजवित होते. शिवाय गाणेही म्हणून घेत होते असा अनुभव भुसावळकरांसाठी पहिलाच होता. नवीन वाद्य वाजविल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

यावेळी आमदार संजय सावकारे, डॉ.राजेश पाटील, रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा, उद्योजक मनोज बियाणी, बांधकाम व्यावसायिक योगेश पाटील, अॅड. तुषार पाटील, रेलसिटीचे अध्यक्ष मनोज सोनार, सचिव तेजस नवगाळे, प्रोजेक्ट चेअरमन विशाल शाह, सुधीर पाचपांडे आदींनी डीजेम्बे वाद्य वाजविण्याचा आनंद घेतला.

Navratri 2023 : आफ्रिकेच्या डिजेम्बे वाद्याची भुसावळकरांना भुरळ; नागरिकांनी घेतला वाद्य वाजविण्याचा आनंद
Navratri 2023 : नववी माळ, सिद्धी प्राप्त करवून देणारी देवी सिद्धादात्री; अशी करावी मातेची पूजा

या कार्यक्रमासाठी एकूण २८० डिजेम्बे वाद्ये होती. दोन टप्प्यात कार्यक्रम झाल्याने सुमारे ५६० भुसावळकरांना हे वाद्य वाजविण्याचा आनंद घेता आला.

"रोटरी रेल सिटीच्या दांडिया उत्सवाने शिस्त, संस्कार व संस्कृती राखत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदा पहिला दिवस नारीशक्तीसाठी समर्पित होता. महिलांनाच आरतीचा व दांडिया खेळण्याचा मान दिला. दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध डिजेम्बे वाद्य वाजविण्याचा आनंद भुसावळकरांनी घेतला. यामुळे ताणतणाव दूर होण्यास मदत होते."-ॲड. विशाल शाह, प्रोजेक्ट चेअरमन

"ड्रम सर्कल ही आमची ॲक्टिव्हिटी आहे. श्रोत्यांना वाद्य देऊन त्यांच्या कडून वाजवून घेतो व गाणे म्हणून घेतो. सर्वजण खूष व आनंदी होतात. जळगाव जिल्ह्यात हा प्रयोग पहिल्यांदाच केला. मात्र पुणे, मुंबई, हैदराबाद तसेच थायलंड मध्ये आमचे प्रयोग झाले आहेत‌." -कपिल छाजेड, टीम धून, पुणे

Navratri 2023 : आफ्रिकेच्या डिजेम्बे वाद्याची भुसावळकरांना भुरळ; नागरिकांनी घेतला वाद्य वाजविण्याचा आनंद
Navratri 2023 : आई अंबाबाईच्या मंदिरातील खांब मोजताच येत नाहीत, हे खरंय का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com