Dr. Ambedkar Statue : डॉ. आंबेडकर पुतळ्याबाबत विधिमंडळात उपमुख्यमंत्र्यांची दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Babasaheb Ambedkar

Dr. Ambedkar Statue : डॉ. आंबेडकर पुतळ्याबाबत विधिमंडळात उपमुख्यमंत्र्यांची दखल

जळगाव : शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यासाठी केलेल्या बेकायदेशीर कार्यवाहीची चौकशी करा, अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी विधिमंडळात केली.

त्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दखल घेतली. (Dr Ambedkar statue removal dispute Deputy Chief Minister incident was recorded on Ambedkar statue in Legislature jalgaon)

जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरील जागेत उभारलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गुरुवारी (ता. १६) सकाळी हटविण्यात आला. त्यामुळे समाजबांधवांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता. आमदार सुरेश भोळे यांनी तत्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुतळा जागेवर बसविण्यासाठी आदेश दिले व पुतळा जागेवर पुन्हा बसविण्यात आला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

मात्र, प्रशासनाच्या या गैरजबाबदारपणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. याची तत्काळ दखल घेत आमदार भोळे यांनी विधिमंडळात माहितीचा मुद्दा अंतर्गत प्रश्‍न उपस्थित केला.

कोणतेही आदेश नसताना व कोणाच्या सांगण्यावरून पुतळा हटविण्यात आला, याची माहिती द्यावी व पुतळा हटविण्यासाठी केलेल्या बेकायदेशीर कार्यवाहीची चौकशी करा, अशी मागणीकेली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आपण या घटनेची नोंद घेतली असल्याचे स्पष्ट केले.