Jalgaon News : जळगावात अवतरणार ‘उच्च सर्वोच्च न्यायालय’

Court
Courtesakal
Updated on

जळगाव : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे स्मृतिप्रीत्यर्थ एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात १६ व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) होणार आहे.

यात विविध राज्यातील विधी महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले आहेत. (Dr Annasaheb G D Bendale Memorial SS 16th National Court Competition will be held at Maniyar Law College jalgaon news)

कोरोना संकटानंतर प्रथमच अभिरूप न्‍यायालय स्पर्धा होणार असून, विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायायलाच्या कामकाजाची माहिती व्हावी, तेथे कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो.

त्याचबरोबर देशातील मोठे खटले कशा पद्धतीने लढले गेले, याची माहिती मिळण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आल्याचे प्रा. डॉ. युवाकुमार रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रा. डॉ. क्षीरसागर, प्रा. धुमाळ, प्रा. विजेतासिंग या वेळी उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये देशभरातील विविध घटक राज्यातून संघ सहभागी होत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. सी. संत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Court
Jalgaon News : दर्ग्याच्या झेंड्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यू.एस.एम. शेख यांची विशेष सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. केसीई सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रमोद पाटील, जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. केतन ढाके, जळगावचे वरिष्ठ वकील ॲड. सुशील अत्रे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश बी. पाटील अध्यक्षस्थानी असतील. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या समारोप आणि बक्षीस वितरण रविवारी (ता. २६) होईल. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे

Court
Jalgaon News : ट्रॅक्टरखाली बकऱ्या आल्याने चालकाला मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com