
Jalgaon News | ठाकरे सेनेचे आंदोलन बेगडी, दिशाभूल करणारे: डॉ. राधेश्याम चौधरी
जळगाव : बुधवारी (ता. २१) महासभेत उपमहापौरांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याचे गुरुवारी (ता. २१)ही पडसाद उमटले व भाजपसह महापालिकेतील सत्ताधारी गटाने आंदोलन केले.
त्यावर भाजपचे सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी यांनी ठाकरे गटाच्या आंदोलनावर बेगडी व दिशाभूल करणारे असल्याची टीका केली. (Dr Radheshyam Chaudhary taunting statement on thackeray sena Jalgaon News)
हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
हेही वाचा: Jalgaon News : कोरोनाचा रुग्ण नाही, तरीही जिल्ह्यात सतर्कता
याबाबत डॉ. चौधरी यांनी म्हटले आहे, की ठाकरे सेनेने भाजपची भूमिका देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामांसोबत जोडत निखालस खोटे, तथ्यहीन आरोप करत आपले पाप लपविण्याचा प्रयत्न केला.
त्यांचे आंदोलन म्हणजे दिशाभूल करणारा कुटिल कांगावा होता. खरंतर पिंप्राळ्यात शिवरायांचे स्मारक व्हावे, यासाठी भाजपच्या सदस्यांचे योगदान हे महापालिकेच्या महासभा इतिवृत्तात नोंदवलेले आहे. तरीही ठाकरे गटाने केलेला प्रकार हास्यास्पद आहे. शेवटी ‘ये पब्लिक है, सब जानती है’, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: Jalgaon News : 3 वर्षीय चिमुरड्यावर कुत्र्यांचा हल्ला; अतिदक्षता विभागात उपचार सुरू