
जळगाव : 3 लाखांच्या ठिबक नळ्या चोरटा अटकेत
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील प्रभंजन ऑटोमोबाईल या ठिबक नळ्या निर्मिती कंपनीतून डिस्ट्रिब्यूटरकडे पोचविलेल्या मालाचे पैसे घेऊन वाहनचालक बेपत्ता झाला होता. एमआयडीसी पोलिसांत दाखल या गुन्ह्यात पोलिसांनी शोध घेत संशयिताला वाहनासह ताब्यात घेतले. (Latest Marathi News)
हेही वाचा: Jalgaon Crime Update : पत्नीच्या डोक्यात हाणली मोगरी
ठिबक नळ्या निर्मिती कंपनी प्रभंजन ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेडमधून जालना येथील तिरुपती इंडस्ट्रीजसाठी ७० बंडल, गोपाल लोहिया सेल्ससाठी ७० बंडल आणि केशव इरिगेशनचे ६१ बंडल असा एकूण दोन लाख ८१ हजार ४०० रुपयांचा माल घेऊन (एमएच १९, एस ८०९७) बोलेरो पिक-अप मार्च महिन्यात जळगाव येथून रवाना झाली होती. निर्धारित वेळेत संबंधितांना माल मिळाला. त्यांनी त्याचे पैसेही घेऊन तिकडून गाडीचालक पंकज रघुनाथ सोनवणे परतीच्या प्रवासाला निघाला. तो, त्याच दिवशी पोचणे अपेक्षित असताना तीन दिवस उलटूनही न पोचल्याने व फोन न उचलल्याने त्याचा शोध सुरू झाला.
हेही वाचा: ट्रक मागे घेताना तरुणाला चिरडले; उपचरादरम्यान तरुणाचा मृत्यू
तो एमआयडीसीत एका ठिकाणी वाहन लावून पळून गेल्याचे आढळल्यानंतर एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. दाखल गुन्ह्यात संशयित नेरी (ता. जामनेर) येथे आल्याची माहिती मिळताच निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुद्दसर काझी, योगेश बारी यांच्या पथकाने त्याला नेरी येथून ताब्यात घेतले. अटकेनंतर मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्या. जे. एस. केळकर यांच्या न्यायालयाने शनिवार (ता. ३०)पर्यंत पोलिस कोठडीत रवाना केले. सरकार पक्षातर्फे ॲड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.
Web Title: Drip Tubes Worth 3 Lakhs Stolen Thief Arrested Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..