Graduate Constituency Election : शनिवार ते सोमवार 3 दिवस मद्यविक्रीवर बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Graduate Constituency Election News

Graduate Constituency Election : शनिवार ते सोमवार 3 दिवस मद्यविक्रीवर बंदी

जळगाव : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे, तर मतमोजणी २ फेब्रुवारीस आहे.(Due to Graduate Constituency Election Liquor sale banned for 3 days from Saturday to Monday jalgaon news)

ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात होण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री बंदीचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काढले आहेत.

जिल्ह्यात २८ जानेवारीस दुपारी चारपासून ते ३० जानेवारीस संपूर्ण दिवस जिल्ह्यात मद्यविक्री (मद्याची दुकाने) बंद राहील. २ फेब्रुवारीस मतमोजणी संपेपर्यंत (ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे) त्या परीक्षेत्रातील मद्यविक्री बंद राहील.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Crop Loan : नगरदेवळ्यातील शेतकऱ्यांना पिक विमा रक्कमेची प्रतीक्षा

जिल्ह्यातील सर्व संबंधित मद्यविक्री अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ५४ (१) (सी) नुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे कळविले आहे.

हेही वाचा: Rahibai Popere: आत्महत्या रोखण्यासाठी जोडधंदा करावा : पद्मश्री राहीबाई पोपेरे