Rahibai Popere News: आत्महत्या रोखण्यासाठी जोडधंदा करावा : पद्मश्री राहीबाई पोपेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amalner: Padmashri Rahibai Popere speaking at women's meeting.

Rahibai Popere: आत्महत्या रोखण्यासाठी जोडधंदा करावा : पद्मश्री राहीबाई पोपेरे

अमळनेर (जि. जळगाव): शेतीसाठी लागणारा खर्च वाढला, परंतु उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीसोबतच जोड व्यवसाय करावा, असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले. (Rahibai popere statement on Add business for farmers jalgaon news)

येथील मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवानिमित्त रविवारी (ता. २२) झालेल्या महिला कार्यशाळेत बोलत होते.

या वेळी जिल्हा कृषी अधिकारी प्रा. संभाजी ठाकूर, सुखदेव भोसले, आहार तज्ज्ञ डॉ. अनिल पाटील, डॉ. अपर्णा मुठे, प्रा. वसुंधरा लांडगे, गायत्री म्हस्के, अनिल भोकरे, संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्थ जयश्री साबे, दादाराम जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पद्मश्री राहीबाई म्हणाल्या, की आदिवासी समाजाने खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. रानभाज्या व पारंपरिक धान्य संस्कृती टिकून आहे.

आजही आदिवासी भागातील नागरिक एक ते दीड किलो मीटर अंतराहून डोक्यावरून पाणी आणून निरोगीजीवन जगत आहे. पुढची पिढी निरोगी व सुदृढ राहण्यासाठी आतापासून कामाला लागले पाहिजे.

मला मातीमुळेच पुरस्कार

लहान वयातच डोक्यावरून मातृछत्र हरपले. वडिलांनी आम्हा सात बहिणींचा सांभाळ केला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दोन बहिणी शिक्षित झाल्या तर चार बहिणी अशिक्षित राहिल्या. वडिलांच्या संस्काराची शिदोरी सोबत असल्याने आज तुमच्यासमोर मार्गदर्शन करू शकले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News : राष्ट्रीय युवा संसदमध्ये युवकांना 1 ते 3 लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी!

गरिबीमुळे शाळेत गेली नाही, पण कृषी पदवी घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना आज मार्गदर्शन करत आहे. पद्मश्री पुरस्कारासह अनेक पुरस्कार मला केवळ काळ्या मातीमुळे मिळाले आहेत. प्रत्येक गावातील महिलेने पारंपरिक पद्धतीने देशी वाणांना जतन करावे.

माहेरी आल्यासारखे वाटले

रेती, माती व शेतीचे आराध्य दैवत असलेल्या मंगळ देवाच्या दर्शनाने भारावून गेली आहे. आजवर अनेक ठिकाणी जाऊन महिलांना मार्गदर्शन केले. परंतु आज कार्यक्रमात नारीशक्तीचा प्रचंड उत्साह दिसला. ही बाब कौतुकास्पद आहे.

मंदिराचा परिसर पाहून माझ्या माहेरीच आल्यासारख वाटले, असेही पद्मश्री पोपेरे म्हणाल्या. योगेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दीपक चौधरी यांनी आभार मानले.

हेही वाचा: Crop Loan : नगरदेवळ्यातील शेतकऱ्यांना पिक विमा रक्कमेची प्रतीक्षा