Crop Loan : नगरदेवळ्यातील शेतकऱ्यांना पिक विमा रक्कमेची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer crop loan

Crop Loan : नगरदेवळ्यातील शेतकऱ्यांना पिक विमा रक्कमेची प्रतीक्षा

नगरदेवळा (जि. जळगाव) : येथील तीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा रोखीने काढलेला होता. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊनही केवळ दहा ते बारा शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून लाभ मिळाला. (Nagardeola Farmers waiting for crop insurance after crops were damaged amount jalgaon news)

मात्र त्या नंतर दोन महिने उलटले तरी देखील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ अद्यापपावेतो मिळू शकला नाही. पीकविम्याबाबत कृषीमंत्री दादा भुसे यांनी तातडीने घोषणा करुन शेतकऱ्यांना रक्कम त्वरित देण्याच्या सूचना पीकविमा कंपन्यांना केल्या होत्या.

तरी देखील या गंभीर बाबीकडे डोळेझाक केली जात असल्याचा सूर संतप्त शेतकऱ्यांमधून निघत आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News : कजगावच्या युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पीकविमा कंपनी खिशातून खर्च केलेल्या रकमेचा लाभ देत नसेल तर शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांनवर विश्वास तरी कसा आणि किती ठेवायला हवा. अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार. शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ त्वरित मिळण्याची मागणी त्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा: Jalgaon News : राष्ट्रीय युवा संसदमध्ये युवकांना 1 ते 3 लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी!