Jalgaon GMC News : ‘जीएमसी’त औषध वैद्यकशास्त्र विभागाचे ढिसाळ नियोजन; ‘एचओडी’च्या मनमानीमुळे रुग्णांचे हाल

GMC Hospital
GMC Hospitalesakal

Jalgaon GMC News : जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या ढिसाळ नियोजनाने रुग्णालयात पुरेसे डॉक्टर वेळेवर उपलबध होत नाहीत. यामुळे रुग्णांची हाल होत असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे.

एचओडी डॉ. भाऊराव नाखले सुट्टीवर असतात, अशी परिस्थिती आहे. अनेक दिवस ते रजेवर जातात. रजेवर जाताना अर्ज टाकून निघून जातात. रजेबाबत अधिष्ठातांना कल्पना देत नाहीत. (Due to poor planning adequate doctors are not available in GMC hospital jalgaon news)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

एम. एस. चार्ज डॉ. गायकवाड यांच्याकडे असल्याने संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांना मेडिसिन विभागाकडे पूर्णपणे लक्ष देता येत नाही. श्री. नाखले दिव्यांग बोर्डात डॉक्टरांच्या व्यवस्थित ड्युट्या लावीत नाहीत.

रुग्णालयातील बाह्य रुग्णांची संख्या वाढली आहे. ‘ओपीडी’ला काय वस्तू लागतात, काय नाही याकडेही ते लक्ष देत नाहीत. तेथे साधी बी. पी. तपासणी मशीन एका महिन्यात सहा वेळा खराब झाली आहे. डिजिटल मशीन केवळ एकच आहे. मात्र रुग्णसंख्या पाहता कमीत कमी दोन तरी हवेत. रुग्णालयात तीन युनिट आहेत. त्यात आणखी तीन ते चार मनुष्यबळ डॉक्टरांचे कमी पडतेय. त्याबाबत नाखले पाठपुरावा करत नाहीत.

अधिष्ठातांनी सर्व विभागांसाठी म्हणून पत्रव्यवहार केलाय. मात्र, औषध वैद्यकशास्त्र विभाग स्वतंत्र पाठपुरावा करीत नाही. अनेकदा वॉर्डात रुग्णांना दाखल करायला जागा नसते. त्याकडे लक्ष दिले जात नाही. नर्सिंग स्टाफवर अवलंबून राहतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

GMC Hospital
Ganeshotsav 2023 : फैजपूरला 86 मंडळांकडून श्रीगणेशाची स्थापना; बाप्पाच्या सव्वा किलो चांदीच्या चरणाचे अनावरण

विभागाचे व्यवस्थापन, सुसूत्रता, ओपीडी कक्षातील व्यवस्थापन याबाबत दुर्लक्ष होत आहे. सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, मलेरिया, अन्नातून प्रकृती खराब होणे अशा तक्रारी रोजच्या असतात. त्यामुळे रोजच्या दोन्ही ओपीडींमधील दोनशेवर रुग्णांची संख्या जात आहे.

या विभागात सध्या एक प्रोफेसर, दोन सहयोगी प्राध्यापक, तर तीन सहाय्यक प्राध्यापक आहेत. वरिष्ठ निवासी पद रिक्त आहे. कनिष्ठ निवासी एकचे चार, कनिष्ठ निवासी तीनचे चार असे मनुष्यबळ आहे. क्षयरोग विभागाचे एक सहाय्यक प्राध्यापक मदतीला असतात. असाच कारभार या विभागाचा सुरू राहिला, तर रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांतर्फे सांगण्यात आले.

GMC Hospital
Chopda Sugar Factory : थकीत रक्कम न मिळाल्यास ‘आत्मक्लेश’; चोसाका’प्रश्‍नी शेतकरी कृती समितीकडून २ ऑक्टोबरची मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com