esakal | पाऊस लांबल्याने खौशीकरांना पाणी टंचाईची भिती
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस लांबल्याने खौशीकरांना पाणी टंचाईची भिती

पाऊस लांबल्याने खौशीकरांना पाणी टंचाईची भिती

sakal_logo
By
प्रा. भूषण बिरारी

पातोंडा ता.अमळनेर : या वर्षी पावसाने (Rain)पाठ फिरवल्यामुळे पातोंडा व पंचक्रोशीत जवळील खौशी गावातील व शेतशिवारातील विहीरी (Well) व कुपनलिकांनी (Borewell) तळ गाठायला सुरूवात केली आहे. खौशी गावाला टॅकरमुक्त करणाऱ्या पाझर तलावामुळे गावातील व तलावाशेजारील विहीरी व कुपनलिका पाण्याने सदन होत्या. परंतू मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी व पूरामुळे पाझर तलाव फुटल्याने पाण्याचा साठा शिल्लक राहिला नाही. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे गावातील विहीरी व कुपनलिकांनी तळ गाठायला सुरूवात केल्याने खौशी गावावर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून पाणी टंचाईच्या (Water Scarcity) झळा सहन करण्याची वेळ येईल अशी भिती गावकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. (due to prolonged rains khaushikars fear water scarcity)

हेही वाचा: जळगाव मनपात बंडखोर नगरसेवकांचा पून्हा भाजपला दे धक्का!

पाझर तलावाच्या दुरूस्ती करीता सरपंच कैलास पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाझर तलावाच्या ठिकाणी पाचारण केले , परंतू वीस ते पंचवीस वर्ष जुन्या पाझर तलावाच्या दुरूस्तीवर पैसा टाकता येत नसल्याचे सांगत शासकीय अधिकाऱ्यांनी अनास्था दाखवत परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात न घेता सदर प्रकरणाकडे पाठ फिरवल्याने गावकऱ्यांच्या पदरी निराशा आली.

हेही वाचा: पंजाबचे जालंधर शहर पर्यटनासाठी आहे खास; जाणून घ्या माहिती

त्यानंतर कैलास पाटील , गजानन सुर्यवंशी व संजय कापडे यांनी पातोंडा व मारवड परीसर विकास मंच कडे धाव घेत मनपा वित्त लेखाधिकारी कपिल पवार , विजय भदाणे उप अभियंता सिन्नर , देवेंद्र साळुंखे अध्यक्ष मारवड विकास मंच, विलास चव्हाण , महेंद्र पाटील , सोपान लोहार , अमित पवार , आनंद कुंभार , घनशाम, विवेक पवार , उमेश पाटील व इतर सदस्यांना खौशी येथे बोलवून आपली समस्या मांडली. पातोंडा व मारवड विकास मंचच्या पुढाकाराने व खौशी ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी वर्गणी गोळा क रून डिझेलची व्यवस्था केल्याने पाझर तलावाच्या खोलीकरणास व वाहून गेलेल्या भिंतीच्या भरावास सुरूवात करण्यात आली. सदर कार्यात डाॅ शामकांत देशमूख , अरूण देशमूख , कैलास पाटील , गजानन सुर्यवंशी, संजय कापडे , गणेश बाविस्कर , अरूण गोसावी , धनराज पवार , अनिल शिरसाठ , योगेश सुर्यवंशी, विशाल सुर्यवंशी व ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले.

हेही वाचा: ईडी झाली येडी..जळगावात राष्ट्रवादीचे ईडीच्या विरोधात आंदोलन

"पातोंडा व मारवड विकास मंच व खौशी ग्रामस्थांच्या सहकार्याने पाझर तलावाचे खोलीकरण व भिंतीला भराव करून देखील पावसाने पाठ फिरवल्याने पाणी टंचाईची भिती मात्र खौशीकरांसमोर आ वासून उभीच आहे. शासनाने व राजकीय नेतृत्वाने पाणी टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन टंचाईपूर्व नियोजन करावे." - कैलास पाटील , सरपंच खौशी

loading image