Railway Recruitment
Railway Recruitmentesakal

Jalgaon News : रेल्वेत नोकर भरतीसाठी E Recruitment Module! 82 जणांना अनुकंपा तत्वावर नेाकरी

Jalgaon News : भुसावळ रेल्वेच्या कार्मिक विभागाने (एच.आर.) वर्षभरात नोकर भरतीसाठी संगणकीकृत ऑनलाइन मॉड्यूल बनविले आहे. यामुळे सर्व प्रक्रिया जलद गतीने होतात. रेल्वेत गेल्या सहा महिन्यांत ८२ जणांना अनुकंपा तत्वावर नोकरी दिली आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या असलेल्या तक्रारींचे ९७.६७ टक्के निवारण केले आहे, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन. एस. काझी यांनी दिली. (E Recruitment Module for railway recruitment 82 persons transferred on compassionate grounds Jalgaon News)

कार्मिक विभागाने २०२२-२३ या वर्षात ‘ई-रिक्रूटमेंट मॉड्यूल’ तयार केले. रेल्वे भर्ती बोर्ड व रेल्वे भर्ती सेलद्वारे होणाऱ्या भरतीच्या जलद प्रक्रियेसाठी विकसित केलेले संगणकीकृत ऑनलाइन मॉड्यूल बनविले आहे.

सर्व प्रक्रिया जलद गतीने होते. ई-सीजी मॉड्यूल भुसावळ विभागात अनुकंपा ग्राउंड उमेदवारांच्या नियुक्तीच्या जलद प्रक्रियेसाठी संगणकीकृत ऑनलाइन मॉड्यूल विकसित केले आहे. यामुळे गेल्या सहा महिन्यांत ८२ अनुकंपा ग्राउंडवर (सीजी) नियुक्त्या करण्यात आल्या.

कामात सुधारणा करण्यासाठी कार्मिक विभागातर्फे रेल्वेच्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. या वित्तीय वर्षात एकूण १० हजार ८१६ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

भुसावळ विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी व मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेटलमेंट प्रकरण मुदतीच्या आत काढले गेले. सेटलमेंटचे शंभर टक्के लक्ष्य गाठले. गेल्या सहा महिन्यांत अशी एकूण १८५ प्रकरणे अंतिम झाली आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Railway Recruitment
Water Management : ओझर, जानोरी भागातील गावांमध्ये पाणी कपात; टंचाई भासू नये यासाठी नियोजन

कर्मचाऱ्यांचे पेमेंट, सेटलमेंट, प्रमोशन, सीनियारिटी आदी सेवा संबंधी रेल्वे कर्मचाऱ्यांची तक्रार असल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ९७.६७ टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले. सरासरी तक्रार विल्हेवाटीची वेळ पाच दिवस आहे. भुसावळ विभागात वेगवेगळ्या विभागांत या वर्षात एकूण ९३२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

ई- डॅश बोर्ड

भुसावल विभागच्या कार्मिक विभागाचे कार्य अचिवमेंट व क्रेडिट कार्य मॉनिटरिंगसाठी प्रशिक्षण डॅश बोर्ड बनविण्यात आला आहे. विविध समस्यांवर देखरेख ठेवण्यासाठी ऑनलाइन संगणकीकृत ई-डॅश बोर्ड विकसित केला आहे.

"कार्मिक विभागाचे कार्य उल्लेखनीय आहे. लासलगाव स्थानकाजवळील दुर्घटनेतील वारसांना ४८ तासांच्या आत सेटलमेंट बेनिफिट देऊन निधी दिला गेला. अवयस्क वारसांना अनुकंपा नियुक्तीसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे."

-एस. एस. केडिया, विभागीय रेल्वे प्रबंधक, भुसावळ

Railway Recruitment
Ambadas Danve : अटी, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करा : अंबादास दानवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com