एकनाथ खडसेंना मोठा झटका..जावाई गिरीश चौधरींना ईडीकडून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknathrao Khadse

एकनाथ खडसेंना मोठा झटका..जावाई गिरीश चौधरींना ईडीकडून अटक

जळगाव ः माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Leader Eknathrao Khadse) यांना भोसरी जमीन (Bhosari land scam) खरेदी प्रकरण चांगलेच भोवत असून त्यांचे जवाई गिरीश चौधरी यांना काल रात्री ईडीने (ED) अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

(ed arrests eknath khadses son in law girish chaudhary)

हेही वाचा: मनपात राजकीय घडामोडी;बंडखोर नगरसेवकांचे गटनेते बदलण्यासाठी पत्र

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे, गिरीश चौधरी यांच्या नावाने भोसरी येथे एमआयडीसी जागा खरेदी केल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणी खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत ही जागा खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तसेच या प्रकरणी झोटींग समिती देखील नेमण्यात आले होते. त्यावरून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागत होता. तसेच त्यानंतर श्री खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू देखील सुरू झाली. आता त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने काल रात्री अटक केल्याने खडसेंच्या भोवती ईडीचा फास आवळला जात आहे.

रात्री उशीरा उटक

एकनाथ खडसेंचे जावाई गिरीश चौधरी यांना रात्री ईडीने ताब्यात घेवून त्यांची रात्रभर चौकशी केल्याचे समजते. त्यामुळे श्री. खडसे भवती ईडीचा फास हळूहळु आता आवरला जात असल्याचे बोलले जात असून त्यांच्या जावाईला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १२९ रुग्ण

भाजपावर खडसेंचे आरोप

एकनाथ खडसेंना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांचे अनेकदा भाजप नेत्यांसोबत खटके उडाले. त्यात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काही नेत्यांवर गंभीर आरोप त्यांनी केले. त्यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करतांना तुम्ही ईडी लावल्यास आम्ही सिडी लावू असे श्री. खडसेंनी सांगितले होते. त्यामुळे आता एकनाथराव खडसे काय करतील, खरंच ते आता सिडी लावतील का ? काय भुमीका घेतात याकडे लक्ष लागून असणार आहे.

loading image
go to top