जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १२९ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १२९ रुग्ण


जळगाव : जिल्ह्यात कोरोना (corona) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर ( corona second wave) नव्यानेच समोर आलेल्या म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराचे आतापर्यंत १२९ रुग्ण आढळले असून, सहव्याधींसह या आजाराने जवळपास १८ रुग्ण (Patient Death) दगावले आहेत. सध्या ६२ उपचाराधीन असून, २७ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. (jalgaon district mucormycosis one hundred twenty nine patient found)

हेही वाचा: मनपात राजकीय घडामोडी;बंडखोर नगरसेवकांचे गटनेते बदलण्यासाठी पत्र


जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनपेक्षितपणे म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचे रुग्ण आढळू लागले. देशभरात या आजाराचा संसर्ग होत असताना, राज्यात त्याचे रुग्ण तुलनेने अधिक होते. जळगाव जिल्ह्यातही या आजाराचे रुग्ण जास्त आढळून आले.

जिल्ह्यात १२९ रुग्ण
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १२९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७६ रुग्णांवर शासकीय महाविद्यालयात, तर ५३ रुग्णांवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचार झाले. यापैकी १२० रुग्णांना कोरोनाची पार्श्वभूमी होती, तर नऊ रुग्णांना कोरोना नसताना म्युकरमायकोसिस झाल्याचे समोर आले आहे. २७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सहव्याधीसह म्युकरमायकोसिसने मृत रुग्णांची संख्या १६ व दोन रुग्ण केवळ ‘म्युकर’च्या आजाराने मृत झाले.

हेही वाचा: जळगावात धाडसी चोरी..चोरट्यांनी तिजोरीच उचलून नेली


६२ रुग्णांवर उपचार
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २९ व डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २४ रुग्ण या दोन्ही रुग्णालयांतून डिस्चार्ज घेऊन अन्य ठिकाणी उपचारासाठी दाखल झाले आहेत. म्युकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी आवश्‍यक अॅम्फोटेरिसिन- बी इंजेक्शनचा मध्यंतरीच्या काळात तुटवडा होता. आता मात्र हे इंजेक्शन सहज उपलब्ध होत असल्याने उपचारही सुलभ झाले आहेत.

loading image
go to top