मनपात राजकीय घडामोडी;बंडखोर नगरसेवकांचे गटनेते बदलण्यासाठी पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corporator letter by mayor

मनपात राजकीय घडामोडी;बंडखोर नगरसेवकांचे गटनेते बदलण्यासाठी पत्र

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) गटनेत्यास (Group leader) बदलण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी (ता. ६) महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांना पत्र देण्यात आले. या माध्यमातून ॲड. दिलीप पोकळे गटनेते, तर चेतन संकत उपगटनेते असतील, अशी माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली.

(rebellious corporator bjp change group leader letter by mayor)

हेही वाचा: जळगावात धाडसी चोरी..चोरट्यांनी तिजोरीच उचलून नेली

अनेक दिवसांपासून भाजपचे गटनेते बदलण्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाध्यक्षांच्या परवानगीशिवाय गटनेते बदलता येणार नसल्याचा दावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सायंकाळी उपमहापौर पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी महापौर सौ. महाजन यांना पत्र दिले. यात पक्षाच्या गटनेतेपदी ॲड. पोकळे, तर उपगटनेतेपदी श्री. संकत यांची नियुक्ती करावी, असे सुचविले आहे. उपमहापौर पाटील यांच्यासह नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ॲड. पोकळे, श्री. संकत, कुंदन काळे, गोकुळ पाटील, किशोर बाविस्कर, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon Municipal Corporation

यासंदर्भात उपमहापौर पाटील म्हणाले, की भाजपचे गटनेते भगत बालाणी यांच्या जागी ॲड. पोकळे, तर राजेंद्र घुगे- पाटील यांच्या जागी चेतन संकत उपगटनेते असतील. मध्यंतरी याबाबत अनेक चर्चा झाल्या असल्या, तरी गटनेते व उपगटनेते बदलण्यासाठी भाजपचे सभागृहातील नेते ललित कोल्हे यांच्या उपस्थितीत १७ जूनला बैठक झाली होती. बैठकीस भाजपचे २९ सदस्य उपस्थित होते. यात गटनेते व उपगटनेत्यांच्या नावांची निश्‍चिती करण्यात आली होती. याबाबतचे पत्र मंगळवारी महापौरांना दिले आहे.

हेही वाचा: गिरीश महाजन समर्थकांचा जामनेरात मोर्चा

...म्हणूनच बदलाचा निर्णय
गटनेता व उपगटनेता निवडीचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले आहे. भाजपचे गटनेते बालाणी यांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाली आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच आमच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नव्हती. आमचे हक्क हिरावून घेतले जात होते. यामुळे गटनेते व उपगटनेते बदलण्याचा निर्णय घेतल्याचे उपमहापौर पाटील यांनी सांगितले.

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon Municipal Corporation

बंडखोरांना अपात्रतेची नोटीस
या हालचाली घडत असताना, तिकडे विभागीय आयुक्त कार्यालयाकड़ून बंडखोर नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्याचे वृत्त आहे. या नोटिसा मंगळवारी (ता. ६) रवाना झाल्याचा दावा भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकाने केला आहे

हेही वाचा: दुबार पेरणीचे संकट; बियाणे-खतांचा शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका

बंडखोरांना अधिकारच नाही- बालाणी
महापालिकेतील भाजपच्या बंडखोर नगरसेवकांच्या बैठकीत झालेली गटनेता निवड बेकायदेशीर आहे. मुळात या गटाची नोंदणीच झाली नसून त्यांना कुठलाही गटनेता निवडीचा अधिकारच नाही, असे स्पष्ट मत भाजप गटनेता भगत बालाणी यांनी व्यक्त केले.

loading image
go to top