esakal | शिक्षण विभाग ग्रामपंचायतींच्या ठरावाच्या प्रतिक्षेत!
sakal

बोलून बातमी शोधा

school

शिक्षण विभाग ग्रामपंचायतींच्या ठरावाच्या प्रतिक्षेत!

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः राज्य शासनाच्या (State Government) शिक्षण विभागाने (Department of Education) ग्रामीण (Rural School) भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवार (ता. १५) पासून हे वर्ग सुरू होतील. वर्ग सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायत (Gram Panchayat), नेमलेली समिती व पालकांच्या संमतीचा ठराव प्रत्येक गावाने शिक्षण विभागाला द्यावयाचा आहे. मात्र, अद्यापपर्यंत शाळा सुरू करण्याचा ठराव शिक्षण विभागाला प्राप्त झालेला नाही. मंगळवारी (ता. १३) किंवा बुधवारी (ता. १४) शाळा सुरू करण्याबाबत ठराव येतील, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.( education department awaits rural school start gram panchayat resolution)

हेही वाचा: भीषण दुर्घटना; कार-दुचाकीच्या अपघातात तीन ठार


कोविड महामारीने दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद होती. आता अनेक गावांत कोरोनाचे रुग्ण आढळत नसून त्यामुळे तेथील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. येत्या १५ जुलैपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ७०८ शाळा व महाविद्यालये सुरू होणार आहेत. आठवी ते बारावीच्याच विद्यार्थ्यांना शाळेत येऊ दिले जाणार आहे. त्यादृष्टीने माध्यमिक शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. ‘चला, मुलांनो शाळेत चला’, अशी मोहीम राबविली जाणार आहे.


कोविडमुक्‍त ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारितील गावातील शाळेतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा, ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे आदेश आहेत. शाळा सुरू करण्याबाबत ठराव ग्रामपंचायतींनी दिले नाही, तर शाळा होणार नाही. गाव कोविडमुक्त असूनही शाळा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होणार आहे. यामुळे कोविडमुक्त गावांनी पालकांशी चर्चा करून, समिती गठीत करणे व शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव देणे गरजेचे आहे.

हेही वाचा: कोरोनाची लाट ओसरल्याने १४३ खासगी कोविड हॉस्पिटल बंद

कोविडमुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार संबंधित गावांकडून प्रस्ताव मागविले आहेत. मंगळवारी किंवा बुधवारी प्रस्ताव येतील. त्याबाबत शाळांचे नियोजन सुरू आहे.
-बी. जे. पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी

loading image