esakal | कोरोनाची लाट ओसरल्याने १४३ खासगी कोविड हॉस्पिटल बंद
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाची लाट ओसरल्याने १४३ खासगी कोविड हॉस्पिटल बंद

कोरोनाची लाट ओसरल्याने १४३ खासगी कोविड हॉस्पिटल बंद

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या (corona) दोन्ही लाटेत जिल्हा कोविड रुग्णालय (District Covid Hospital) (शासकीय महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालय), डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय या शासकीय कोविड रुग्णालयाव्यतिरिक्त एकूण १४३ खासगी कोविड हॉस्पिटल्सनी (Private Covid Hospital) सेवा दिली. आता दुसरी लाट ओसरत असताना, खासगी कोविड हॉस्पिटल बोटावर मोजण्याएवढी सुरू आहेत. इतर खासगी रुग्णालयांनी नियमित नॉन कोविड सेवा (Non covid service) सुरू केल्या आहेत. तिसरी लाट आली, तर ही रुग्णालये पुन्हा होतील. (private covid Hospital closed due to wave of corona)

हेही वाचा: भीषण दुर्घटना; कार-दुचाकीच्या अपघातात तीन ठार


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खासगी रुग्णालये अनेक सुरू झाली. कोरोना झाल्यास छातीत कफ होऊन न्यूमोनियाचे रुग्ण अधिक होते. न्यूमोनियामुळे त्यांना श्‍वास घेण्यास अडचण येत होती. अशा रुग्णांचे प्रमाण अधिक होते. रुग्णाला बाधा झाल्यानंतर तो लवकर आला, त्यावर उपचार चांगला झाला तर तो बरा होत असे. रुग्णाला अगोदरच विविध व्याधी असतील, त्यात तो उशिरा आला, त्याहीपेक्षा त्याचे वय ५० च्यावर असेल तर असा रुग्ण क्रिटिकल समजला जाईल. पहिल्या लाटेत कोरोना व्याधीग्रस्त ज्येष्ठांना लवकर बाधा करीत होता. सर्वाधिक ज्येष्ठांचे व विविध व्याधी असलेल्याचे बळी पहिल्या लाटेत गेले. न्यूमोनिया झालेल्यांना द्यावे लागणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात झाला. ५० ते ८० हजार एका रेमडेसिव्हिरसाठी रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांनी मोजले होते. तरीही अनेकांना प्राण गमवावे लागले. शासकीय रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयांनी स्पेशल वॉर्ड, तपासणीची सेवा दिली अन्‌ त्याप्रमाणात मोबादलाही घेतला. अवाच्या सव्वा बिले रुग्णांकडून वसुली झाली. अनेकांनी तक्रारी केल्यानंतर शासनाने ठरवून दिल्यापेक्षा अधिक रक्कम घेतलेल्या रुग्णालयांना अधिकची रक्कम परत करावी लागली.


दुसऱ्या लाटेत शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने सर्वच रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. या लाटेने युवकांना अधिक बाधित केले. ऑक्सिजनचा तुटवडा भासल्याने टँकरने जिल्ह्यात ऑक्सिजन आणला गेला. व्हेंटिलेटरची गरजही अधिक भासली. या लाटेत रुग्णांचा सर्वाधिक उच्चांक बारा हजारांपर्यंत गेला होता. ‘थ्री टी’ (शोध, तपासणी, उपचार) या पद्धतीने रुग्ण लवकर आढळले. त्यांच्यावर उपचार लवकर झाले. उशिराने आलेल्या रुग्णांना वाचविता आले नाही. या लाटेने ऑक्सिजनचे महत्त्व अबाधित केले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्ण अडीचशेच्या टप्प्यात

दुसरी लाट काहीअंशी आहे. तिसरी लाट येईल तेव्हा येईल. त्यापेक्षा नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घेणे, नियम पाळल्यास कोरोना चार हात लांब राहील. विशेष म्हणजे स्वतःची इम्युनिटी पॉवर आबाधित ठेवावी. ‘नियम’ पाळले तर ‘यम’ येणार नाही.
-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

हेही वाचा: पंजाबचे जालंधर शहर पर्यटनासाठी आहे खास; जाणून घ्या माहिती

एकूण बाधित रुग्ण : एक लाख ४२ हजार ४५४
एकूण बरे झालेले रुग्ण : एक लाख ३९ हजार ६१६
एकूण मृत्यू : दोन हजार ५७४
सध्या ॲक्टिव्ह रुग्ण : २६४

loading image