Jalgaon: भारतात कापसाच्या 5 कोटी गाठी तयार करण्याचे प्रयत्न; देशभरातील जिनींग प्रेसिंग कारखानदारांचा विश्‍वास

Cotton News
Cotton Newsesakal
Updated on

जळगाव : देशात यंदा सरासरीच्या केवळ ९४ टक्के पाउस झाला आहे. देशात कापूस लागवड मागील हंगामाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी झाली आहे. असे असले, तरी देशात सध्या ३ कोटी २० लाख ते ३ कोटी ५० लाख गाठींचे उत्पन्न होते.

ते ५ कोटीपर्यंत नेण्यासाठी कापूस लागवड वाढीसाठी शासनासह शेतकरी, सहकारी संस्थांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचा सूर खानदेश जिनींग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनच्या नॉर्थ गोवा येथे नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय बैठकीतून निघाला. (Efforts to produce 5 crore bales of cotton in India Trusted by ginning pressing manufacturers across country Jalgaon)

देशात नव्या हंगामात (२०२३-२४) कापसाचे उत्पादन ३२० ते ३२५ कोटी गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढे राहू शकते. आगामी काळात कपाशीचे क्षेत्र वाढण्यासाठी केंद्र, राज्य शासनाने भरघोस उत्पन्न देणारे नवीन वाण आणावे.

कपाशी पेरताना दोन रोपांमध्ये पाच फुटऐवजी तीन फुट अंतर ठेवल्यास झाडांची संख्या वाढेल. सोबतच उत्पन्न वाढेल. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही ठरविण्यात आले.

असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, उपाध्यक्ष अनिल सोमाणी, जीवन बयस, सचिव लक्ष्मण पाटील, अविनाश काबरा, विनय कोठारी, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा, महाराष्ट्र राज्य जिनींग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह राजपाल, अरूण खेतान आदी उपस्थित होते.

दोन दिवस या बैठकीत कापूस व्यापार व उत्पादन, पुढील अडचणी, गरजा यावर चर्चा झाली. श्री. गणात्रा म्हणाले, २०२२-२३ च्या हंगामात देशात ३१६ कोटी गाठींची निर्मिती झाली आहे. १३ कोटी गाठींची आयात झाली असून, फक्त १६ कोटी गाठींची निर्यात झाली.

Cotton News
Nanadurbar Agriculture News : शेतकरी धास्तावला; पपईवर डाऊनी, मोझॅकचा प्रादुर्भाव

देशात ३११ कोटी गाठींचा वापर सरत्या हंगामात झाला आहे. यंदा कोरडवाहू कापसाची लागवड १५ ते २० दिवस उशिराने झाली. त्यामुळे लागवड पाच टक्के कमी झाली. देशात यंदा वस्त्रोद्योग १०० टक्के क्षमतेने कार्यरत राहिल्यास कापसाचा वापर वाढू शकतो, असेही गणात्रा म्हणाले.

कापूस व्यापाराचे जाणकार रमण भल्ला म्हणाले, जगात कापडाचा उपयोग कमी झाला आहे. पण अमेरिका व चीनमध्ये कापूस उत्पादनात घट येईल.

अमेरिकेतील कापूस उत्पादनात ३५ लाख गाठींची घट येईल, असा अंदाज नुकताच आला आहे. यातच पुढील २० दिवस कापूस व्यापारासंबंधी महत्त्वाचे असून, या कालावधीमधील घडामोडींवर बाजाराची चाल अवलंबून असणार आहे.

"देशात कपाशीचे उत्पादन वाढले पाहिजे. त्यामुळे शेतकरी व जिनर्सचा फायदा होइल. भारतातच कपाशीला अधिक मागणी आहे. यामुळे भारतात कापूस आयात करण्याची वेळ आहे. देशात कपाशीचे उत्पादन वाढल्यास शेतकरी, जिनिर्स, देशाचा फायदा होईल."

-प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग मिल ओनर्स असोसिएशन

Cotton News
Dhule Agriculture News : कोथिंबीर 150 रुपये प्रतिकिलो...! पितृपक्षामुळे किरकोळ विक्रीचे भाव कडाडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com