Nanadurbar Agriculture News : शेतकरी धास्तावला; पपईवर डाऊनी, मोझॅकचा प्रादुर्भाव

Papaya trees are turning yellow due to viral disease in many parts of the taluk.
Papaya trees are turning yellow due to viral disease in many parts of the taluk.esakal

Nanadurbar Agriculture News : तालुक्यात झालेला अल्प पाऊस, त्यातच वातावरण बदलाचा सर्वांत मोठा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, पपई पिकावर विविध बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.

त्यात डाउनी व मोझॅक व्हायरसमुळे पाने पिवळी पडत आहेत. पिकासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च अचानक आलेल्या या आजारामुळे वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गात असल्याने धास्तावला आहे.(farmer was scared due to Downey and Mosaic virus on papaya tree nandurbar news)

बाजारात मिळणाऱ्या महागड्या औषधांची फवारणी करून या आजारांना अटकाव करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू असला, तरी कृषी विभागातर्फे मार्गदर्शन मिळावे, ही अपेक्षा आहे.जिल्ह्यात शहादा तालुक्यात सर्वाधिक चार हजार ३०० हेक्टरपर्यंत पपईची लागवड करण्यात आली आहे.

बहुधा राज्यात सर्वाधिक लागवडही शहादा तालुक्यातच असावी, पपई उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च लागतो. सुरवातीला लागवडीवेळी उन्हाच्या तीव्रतेने मररोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे तीन ते चार वेळा रोपे आणून पुन्हा लागवड करावी लागली. महागडे रासायनिक खत, वेगवेगळ्या कंपन्यांची औषध फवारणी, त्यातच अनेक विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याने साहजिकच खर्चाचे प्रमाण वाढले.

दर वर्षी पपईचा दर कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सोसावी लागते. लागवडीपासून तर काढणीपर्यंत होणाऱ्या लाखोंच्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Papaya trees are turning yellow due to viral disease in many parts of the taluk.
Nandurbar Agriculture News : सोयाबीन पिकावर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव; कापूस पिकालाही फटका

बुरशीजन्य आजार

डाउनी व मोझॅक आजारामुळे पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत, तर फळाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे एकूणच त्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे पपई उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे. कृषी विभागातर्फे पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून या रोगांच्या नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक घ्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

डाउनीचा प्रादुर्भाव

सध्या पपईच्या झाडाला फळे लगडलेली आहेत. त्यातच डाउनीने पछाडले आहे. यात झाडाची पाने पिवळे पडणे, पानांची छत्री बारीक होणे, कोरडी पडणे आदी प्रकार घडत आहेत. पपई पीक मुख्यतः पानांच्या छत्रीवर अवलंबून असते. या पिकात पानांची छत्री गेल्यास झाडच कमकुवत होते. फळांवर सावली नसल्याने फळांना उन्हाचे चटके बसतात. फळ खराब होऊन आर्थिक नुकसान होते. खरेदीवेळी व्यापारीही माल घेत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. कृषी विभागाने वेळीच मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

''सध्या डाउनी व मोझॅक व्हायरसने पपईवर ॲटॅक केला आहे. बाजारातील विविध महागड्या औषधांची फवारणी सुरू आहे. कृषी विभागानेही फवारणीसंबंधी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा आहे.''-विशाल पाटील,पपई उत्पादक शेतकरी, पाडळदा

Papaya trees are turning yellow due to viral disease in many parts of the taluk.
Dhule Agriculture News : कोथिंबीर 150 रुपये प्रतिकिलो...! पितृपक्षामुळे किरकोळ विक्रीचे भाव कडाडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com