एकनाथ खडसेंच्या याचिकेवर ८ मार्चला सुनावणी; संभाव्य कारवाईही टळली  

सचिन जोशी
Wednesday, 24 February 2021

ईडीने नोटीस बजावली असून, इएसआयर दाखल केली आहे. या प्रकरणात तीन यंत्रणांनी चौकशी केली असून, दाखल गुन्ह्यात पोलिसांनी ‘क्लोजर रिपोर्ट’ ही न्यायालयात सादर केला आहे.

जळगाव : सक्तवसुली संचलनालयाने बजावलेली नोटीस व दाखल केलेली इएसआयर रद्द करण्याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आता ८ मार्चला सुनावणी होणार आहे. 

आवश्य वाचा- खानदेशच्या सुपुत्राचा गुजरात मध्ये डंका ! दुसऱ्यांदा नगरसेवक पदी विजयी
 

भोसरीतील (पुणे) कथित जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात श्री. खडसे यांना ईडीने नोटीस बजावली असून, इएसआयर दाखल केली आहे. या प्रकरणात तीन यंत्रणांनी चौकशी केली असून, दाखल गुन्ह्यात पोलिसांनी ‘क्लोजर रिपोर्ट’ ही न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे ही केस रद्द करावी, अशी मागणी करणारी खडसे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहे. बुधवारी (ता. २४) त्यावर कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे न्यायालयाने ८ मार्च तारीख दिली आहे. तोपर्यंत खडसे यांच्यावरील संभाव्य कारवाईही टळली आहे. 

आवर्जून वाचा- दुर्दैवी घटना: व्याहीच्या अंत्यविधीहून परतणाऱ्या विहिणीचा अपघातात मृत्यू 
 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर ते स्वत: व नंतर खडसेही कोरोना पॉझिटिव्ह आले होते. सध्या खडसेंसह त्यांच्या पत्नी तथा जिल्हा दूध संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे दोघेही मुंबईत उपचार घेत आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eknath khadse marathi news jalgaon eknath khadse court petition next date received inspected