Latest Marathi News | शिंदे-फडणवीस गटाचे आमदार अस्वस्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath khadse Taunting Statement to MLA Shide Fadanvis Group

Eknath Khadse Taunting Statement : शिंदे-फडणवीस गटाचे आमदार अस्वस्थ

जळगाव : मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे-फडणवीस गटातील आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळेच त्यांची अस्वस्थता आता बाहेर पडत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला, जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

या वेळी बोलताना ते म्हणाले, की मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल, आपली मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा शिंदे-फडणवीस सरकारमधील सर्व आमदारांची आहे.(Eknath Khadse Taunting Statement MLAs of Shinde Fadnavis group upset Jalgaon Political News)

हेही वाचा: Guardian Minister Gulabrao Patil : 79.98 दलघमी आकस्मिक पाणी आरक्षणास बैठकीत मान्यता

मात्र विस्तार लांबत असल्याने आपली संधी जाते की काय या विचाराने त्यांची अस्वस्थता वाढत असून, ती आता बाहेर पडू लागली आहे. सरकारमधील ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील एक हजार कोटींची कामे रद्द केली. त्यामुळे सर्वपक्षीय आमदार नाराज आहेत.

भुसावळ येथील पालिकेचे नगरसेवक अपात्र ठरविण्याबाबत नगरविकास विभागाने दिलेल्या निर्णयाबाबत बोलताना ते म्हणाले, की जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई केली, तर मुख्यमंत्र्यांनी आमच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय दिला, ते आमच्या बाजूने निर्णय देतील, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते आणि तेच झाले, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. मात्र या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत.

हेही वाचा: Crime Update : माथेफिरूंनी लावली Parkingमधील वाहनांना आग