Guardian Minister Gulabrao Patil : 79.98 दलघमी आकस्मिक पाणी आरक्षणास बैठकीत मान्यता

Guardian Minister Gulabrao Patil while giving instructions in the district level Casual drinking water determination committee meeting
Guardian Minister Gulabrao Patil while giving instructions in the district level Casual drinking water determination committee meetingesakal

जळगाव : जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ७९.९८ दशलक्ष घनमीटर मागणी आरक्षणास मान्यता दिली आहे. लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य वितरिका व पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या वेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ज्या दहा लघुप्रकल्पांमध्ये अल्पसाठा आहे त्या प्रकल्पांतर्गत गावांमध्ये पाणीटंचाई भासू नये यासाठी सूक्ष्म नियोजन करून भविष्यात पाणीटंचाई होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली.

जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून, त्यावर १४० गावे अवलंबून आहेत. बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी, अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा आणि गूळ या मध्यम प्रकल्पांवर १११ गावे अवलंबून आहेत, तर ४० लघु प्रकल्पांचा १११ गावांना लाभ होतो.(79.98 Dalghami casual water reservation approved in meeting Jalgaon News)

Guardian Minister Gulabrao Patil while giving instructions in the district level Casual drinking water determination committee meeting
Jalgaon : ‘अमृत 2.0’ प्रस्तावाच्या मक्त्यावर तीन तास चर्चा,तरीही विषय तहकूब

अर्थात, तिन्ही प्रकारांतील प्रकल्पांचा जिल्ह्यातील ३६२ गावांना लाभ होतो. या सर्व प्रकल्पांमधील ७९.९८ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणाला या बैठकीत मान्यता देण्यात आली.जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २१) अजिंठा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, अधीक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण एस. डी. दळवी, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. अग्रवाल, शहर अभियंता एम. जी. गिरगावकर, महसूलचे नायब तहसीलदार अमित भोईटे, पाटबंधारे विभागाचे डी. बी. बेहेरे, मध्यम प्रकल्पाच्या अदिती कुलकर्णी, मजीप्रा अधीक्षक अभियंता एस. सी. निकम, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. एस. भोगवडे व महसूल सहाय्यक मोनीष बेंडाळे व उपअभियंता शशिकांत चौधरी उपस्थित होते.

Guardian Minister Gulabrao Patil while giving instructions in the district level Casual drinking water determination committee meeting
Jalgaon : रथमार्ग दुरुस्तीवरून रणकंदन; अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

प्रास्ताविकात श्री. दळवी यांनी पाणी आरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. नायब तहसीलदार भोईटे यांनी सूत्रसंचालन केले.

अकरा गावांचा नव्याने समावेश

अंजनी मध्यम प्रकल्पांतर्गत पाणी आरक्षण कल्याणे खुर्द, वाघाळूद, चावळखेडा, पिंपळेसीम, भोद बुद्रुक, भोद खुर्द, हनुमंतखेडे, कल्याणे होळ, हिंगोणे खुर्द सतखेडा या अकरा गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व ग्रामस्थांना पिण्याच्या पाणीवापरासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

Guardian Minister Gulabrao Patil while giving instructions in the district level Casual drinking water determination committee meeting
Kirankumar Bakale Controversy : बकालेंच्या अटकेचा मार्ग मोकळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com