Jalgaon News : चोसाकाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची शुक्रवारी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Chopda Shetkari Sahakari Sugar Factory

Jalgaon News : चोसाकाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची शुक्रवारी निवड

चोपडा (जि. जळगाव) : भाडेतत्त्वावर गेलेल्या चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड येत्या शुक्रवारी (ता. २४) दुपारी बाराला होणार आहे. (election of president vice president of Chopda Shetkari Sahakari Sugar Factory will be held on Friday jalgaon news)

कारखाना साईट सभागृहात सर्वपक्षिय नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

चोसाकाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधिक संचालक निवडून आल्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद काँग्रेस, भाजपा, शेतकरी कृती समिती यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, पिपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, बाजार समितीचे माजी सभापती गोपाळ पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. तर उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यात काँग्रेसकडून शिवाजीराव देसले, गोपाळ धनगर, शेतकरी कृती समितीकडून एस. बी. पाटील, चोसाका माजी उपाध्यक्ष शशिकांत देवरे, डॉ अनिल पाटील, महिलांना संधी दिल्यास हातेड आश्रमशाळेच्या सचिव मिनाक्षी सोनवणे,

काजीपुरा येथील माजी सरपंच आशाबाई पवार यांच्यापैकी एखादे नाव पुढे येऊ शकते. मात्र, यावर अंतीम निर्णय सर्वपक्षीय नेतेच घेऊन शिक्कामोर्तब करणार आहेत.