
जळगावच्या एरंडोल तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये आई, मुलगा, सून व दोन लहान मुलांचा समावेश असून तीन वर्षांची मुलगी मात्र बचावली.
पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून अपघात की घातपात याबाबत चौकशी सुरू आहे.
राज्य सर्वदूर मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, अनेक जिल्हयांत शेतीचे मोठे नुकसान झाल आहे. तर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या काही दुर्घटनाही घडल्या आहेत. दरम्यान जळगावमधील एरंडोलमध्ये विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणैांचा दुर्देवी मृत्यू झाला असून या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. हा अपघात आहे की घातपात याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.