Jalgaon News: महापालिकेने नोटीस देवूनही, उभारले मोबाईल टॉवर; नागरिकांच्या विरोधाचीही ऐसीतैसी

Mobile Network
Mobile Network esakal

Jalgaon News : महापालिकेच्या नगररचना विभागाने मोबाईल टॉवर उभारण्याबाबत संबंधित मिळकत धारकांस नोटीस बजावली, नागरिकांनीही विरोध केला.. परंतु कोणासही न जुमानत श्रावण नगरात कंपनीने वेगाने काम करून एका दिवसात मोबाईल टॉवरची उभारणी केली.

यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. (Even after giving notice by Municipal Corporation mobile tower was erected jalgaon news )

शहरातील काशिनाथ नगराच्या जवळ असलेल्या श्रावण नगरात एका गल्लीत अगोदरच एका कंपनीचे मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. त्यात आता याच गल्लीत दुसऱ्या कंपनीने एका इमारतीवर मोबाईल टावर उभारलेले आहे. नवीन उभारण्यात येणाऱ्या टॉवरला गल्लीतील नागरिकांनी विरोध केला होता.

अगोदरच एक टॉवर आहे, त्याचे रेडीएशन आम्ही झेलतो आहोत, आता पुन्हा नवीन टॉवर याच गल्लीत उभे राहिल्यास त्याचे अधिक रेडीएशन निर्माण होऊन गल्लीतील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो, त्यामुळे नवीन टॉवर उभारू नये अशी त्यांनी मागणी केली.महापालिकेलाही त्यांनी निवेदन दिले होते.

Mobile Network
Diwali Pollution: लक्ष्मीपूजनाला फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी 212 टक्के; नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

महापालिकेची नोटीस..

महापालिकेने नागरिकांच्या विरोधाची दखल घेवून संबधित घरमालकास नोटीस बजावली आहे. त्यांना त्याचे उत्तर देण्याबाबतही कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी उत्तर दिले की, नाही याबाबत माहिती नाही.

एका रात्रीत टॉवरची उभारणी

महापालिकेच्या नोटीस दिली, नागरिकांनी विरोध केला परंतु टॉवर उभारणीचे काम थांबले नाही,उलट वेगात काम करण्यात आले आणि एका रात्रीत मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे.

संतप्त नागरिक आंदोलन करणार

महापालिका प्रशासनाची नोटीस तसेच नागरिकांचा विरोध असतांनाही एका रात्रीत मोबईल टॉवरची उभारणी करण्यात येत असेल तर महापालिका प्रशासनाने त्यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जर टॉवरवर कारवाई होवून ते काढण्यात आले नाही तर आंदोलन करण्याचा ईशाराही नागरिकांनी दिला आहे .

Mobile Network
Bahinabai Smarak: बहिणाबाईंच्या आसोद्यातील 10 कोटींच्या सुधारीत स्मारकाला मंजुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com