देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; बनावट लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणी शिवसेनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fake Vaccination Certificate four givers in police custody

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; बनावट लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणी शिवसेनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

धुळे : देशाची राजमुद्रा असलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र(corona vaccination certificate) थेट बनावट स्वरूपात तयार करून ते विक्री केल्या प्रकरणी महापालिकेच्या (dhule carporation)आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी. तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

हेही वाचा: जळगाव : धुळे-सोलापूर महामार्गावर वर्षभराच्या अपघातांमध्ये पंधरा बळी

शिवसेनेने म्हटले आहे, की जागतिक महामारी असलेल्या कोरोना काळातील संकटात महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे लस न देता ४०० ते ५०० रुपये घेऊन सरासरी आठ ते दहा हजार लसीकरणाची बोगस, बनावट प्रमाणपत्रे वितरित केली गेली आहे. ही गंभीर बाब आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्यात प्रवास किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार आहे. या शासकीय आदेशाची अंमलबजावणी करणे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची अथवा त्या- त्या विभागाची जबाबदारी आहे.

मात्र, येथील महापालिकेने बनावट लसीकरण प्रमाणपत्र विकण्याचा उद्योग सुरू केला. एसव्हीके नामक लसीकरण केंद्रावर एका दिवसात तब्बल दोन हजार ४०० बनावट प्रमाणपत्र देण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. सुटीच्या दिवशी लसीकरण केंद्र बंद असतानाही मनपाच्या महाभागांनी बनावट प्रमाणपत्र वाटप केले. लसीकरण केलेले नसताना बनावट प्रमाणपत्र दिल्यामुळे लसीच्या बाटल्या काळ्याबाजारात विक्रीची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेत सुमारे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आहे.

हेही वाचा: जळगाव- धुळे महामार्गावर होणार ट्रामा सेंटर; जखमींना तात्‍काळ उपचाराची सोय 

वरिष्ठांच्या आदेशाने घोटाळा केल्याचे लेखी पत्र काही कर्मचाऱ्यांनी दिले आहे. एका राजकीय नेत्याच्या दबावामुळे थातूरमातूर कारवाई करून यातील बड्या महाभागांना वाचविण्याचा प्रकार मनपात शिजतो आहे. त्यामुळे जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईसह गुन्हा दाखल करावा. यातील लसीकरण केंद्रावरील नियुक्ती कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यास सत्य उजेडात येऊ शकेल, असे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, महानगरप्रमुख मनोज मोरे, संजय वाल्हे, राजेंद्र ढवळे, अजित बागूल आदींनी म्हटले आहे.

हेही वाचा: धुळे-सोलापूर महामार्गावर अपघात : कार दुभाजकाला धडकून रॉंगसाईड पलटी; चालकाचा मृत्यू

मालेगाव कनेक्शनमुळे चौकशी करा

मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागानेही धुळे मनपा आरोग्य विभागाला पत्र दिले आहे. त्यात मालेगावचे नागरिक धुळे येथून बनावट लसीकरण प्रमाणपत्र घेत असल्याचे म्हटले आहे. यात पहिला व दुसऱ्या डोससाठी एकच बॅच नं ४१२१MC०९५ हा वापरण्यात आला आहे. याबाबत चौकशीतून कारवाई झाली पाहिजे. हा संघटित गुन्हेगारी व देशद्रोहाचा प्रकार आहे, असेही शिवसेनेने निवेदनात नमूद केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top