मानसिकता खचु न देता शेतकऱ्यांनी धैर्याने संकटाला सामोरे जावे  

मानसिकता खचु न देता शेतकऱ्यांनी धैर्याने संकटाला सामोरे जावे  

पारोळा: कोरोना काळात जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्थांनी चांगले कार्य केले आहे. त्यांची मदत घेऊन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या चे प्रमाण कमी करण्यासाठी उपक्रम राबवणार असून शेतकऱ्यांनी नैराश्य दूर करून आपले मन मोकळे करा प्रशासन आपल्या पाठीशी आहेत असे मत जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांनी प्रतिपादन केले.


देवेन्द्र नर्सरी मोरफळ येथील भरारी फाउंडेशन आयोजित शेतकरी संवेदना अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी एन पाटील, निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील जळगाव प्रांत मिठ्ठे, एरंडोल प्रांत विनय गोसावी, तहसीलदार अनिल गव्हांदे ,कृषी अधीक्षक संभाजी पाटील,कृषी उपसंचालक अनिल भोकरे ,तपोवन येथील रुस जॉन्सन ,के के कॅन्स चे उद्योजक रजनीकांत कोठारी, कृषी सम्राट चे बाळासाहेब सूर्यवंशी नवरंग चहाचे अनिल कुकरेजा,नोबेल फाउंडेशन चे जयदीप पाटील, भरारी फाउंडेशन चे दीपक परदेशी सचिन महाजन ,सुदर्शन पाटील,उद्योजक संजय पाटील यांच्या सह विविध विभागातील अधिकारी, कृषी मित्र, प्रगतिशील शेतकरी,बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी नांगर ची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली. भरारी चे प्रमुख दीपक परदेशी संस्था मागील 5 वर्षी पासून आत्महत्या ग्रस्त कुटुंबासाठी कार्य करत असून या पुढे आत्महत्या ग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्नाची जबादारी घेणार आहे जिल्ह्यात सर्वात जास्त 85 शेतकरी आत्महत्या या पारोळा ता झाल्या असून त्यामुळे सदर अभियान पारोळा पासून सुरुवात केल्याचे व या पूर्वी 750 विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्याचे स्पष्ट केले.

शेतकऱ्यांचा मुलीला संसार उपयोगी वस्तू

बॉक्स  -दोघांना संसार उपयोगी साहित्याची मदत - यावेळी भरारी फाउंडेशन कडून लोणी खु येथील शेतकरीच्या मुली ज्यांचे या महिन्यात लग्न होत आहे.अश्या मुलींना जळगांव येथील अग्रवाल व जैन महीला मंडळाकडुन पूनम अशोक पाटील 21 व प्रेरणा राजेंद्र पाटील 22 यांना जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा

दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमात दुसऱ्या टप्प्यात कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी शेतकऱ्यांनी नैराश्य झटकून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा ,कृषी कर्ज नियमित फेड करावी ,खर्च कमी करावे आधुनिक पद्धतीवर भर देण्याचे आवाहन केले. तर डॉ नेहते यांनी मानसिक विषयावर मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांनी मांडले गऱ्हाणे

कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पारोळा तहसील ला भेट दिली. यावेळी लोणी खु येथील शेतकऱ्यांनी शेत रस्त्या बाबत आपले गऱ्हाणे मांडले असता त्यांनी गाव नकाशा पासून पर्यायी रस्ता करण्याचे आदेश तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना दिले.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com