Jalgaon Agriculture News : ..अखेर 15 एकरातील कपाशी उपटून फेकली; तोंडापूर येथील शेतकरी हतबल

Farmers uprooting standing cotton plants in the field.
Farmers uprooting standing cotton plants in the field. esakal

Jalgaon Agriculture News : येथील शेतकरी सुधाकर पाटील यांनी आपल्या १५ एकर कपाशीच्या शेतात सरदार ॲग्रो फर्टिलायझर (गुजरात) कंपनीचे खत दिले.

परंतु दोन महिन्यानंतर पिकाला फुले, कळ्या येत नसल्याने अखेर वैतागलेल्या व हतबल झालेल्या या शेतकऱ्याने संपूर्ण शेतातील कपाशी उपटून फेकली. कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. (farmer uprooted entire field of cotton and threw it jalgaon agriculture news)

तोंडापूर परिसरात कुंभारी बुद्रुक, ढालगाव, ढालसिंगी, मांडवे, खांडवे, भारुडखेडा येथील १३५ शेतकऱ्यांनी बालाजी ट्रेडर्स या दुकानात सरदार ॲग्रो फर्टिलायझर कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट हे खत वापरल्याने सुरुवातीला पिकाची वाढ न झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी सुधारणा करण्यासाठी विविध औषधी व खतांचा वापर करून सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले.

कपाशीचे पिक वाढले. मात्र फुले, कळ्या येत नसल्याने कपाशीची पाहिजे तशी वाढ होऊन उत्पन्न होणार नाही. दरवर्षीप्रमाणे कापूस पिकणार नसल्यामुळे तीनही भावाच्या प्रत्येकी ५ एकर कपाशीच्या पिकाची १५ एकर पीक उपटून काढण्यात आले. कपाशीच्या आत मका पिकाची लागवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmers uprooting standing cotton plants in the field.
Dhule Agriculture News : नैसर्गिक शेतीतून 6 लाखांचे निव्वळ उत्पन्न; प्रगतिशील शेतकऱ्याचा विषमुक्त शेतीवर भर

दोन ते अडीच महिने होऊनही कपाशीच्या पिकात सुधारणा झाली नसल्याने व संबंधित ज्या कंपनीचे खत वापरण्यात आले. ते खत नाशिकच्या प्रयोग शाळेत जिल्हा कृषी अधिकारी जळगाव यांनी तपासणीसाठी पाठवले असता अप्रमाणित आढळून आले आहे.

मात्र आजपर्यंत ज्या दुकानदारांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्याच्याकडून किंवा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, नुकसान झालेल्या शेतात मंत्री गिरीश महाजन यांनी कपाशीच्या पिकांची स्वत: येऊन पाहणी केली होती.

त्याच शेतातील कपाशी शेतकरी सुधाकर पाटील व पदमाकर पाटील यांनी १५ एकर कपाशी शेतातून उपटून टाकली आहे. झालेल्या कपाशीच्या पिकाचे नुकसान दुकानदार व सरदार ॲग्रो फर्टिलायझर केमिकल कंपनी गुजरात याच्याकडून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Farmers uprooting standing cotton plants in the field.
Jalgaon Agriculture News : खानदेशातील शेतकऱ्यांची पांढऱ्या सोन्याला पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com