Latest Marathi News | शेतशिवारात वन्यपाण्यांचा उपद्रव; पिकांची नासधूस होत असल्याने शेतकरी संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wild life

शेतशिवारात वन्यपाण्यांचा उपद्रव; पिकांची नासधूस होत असल्याने शेतकरी संकटात

कजगाव (ता. भडगाव) : येथून जवळच असलेल्या भोरटेक, कजगाव शिवारात अद्यापही वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरूच असून, पिकांचे नुकसानीचे सत्र थांबता थांबत नसल्याने शेतकरी पार मेटाकुटीला आला आहे. २०२१ व २०२२ मध्ये झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई मिळता मिळत नाही. पुन्हा वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे कपाशी पिकांची मोठी नासधूस होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. (Latest Marathi News)

कजगावसह परिसरातील अनेक खेड्यावरील बरड भागात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीन आहेत. काही जमिनी या वन विभागाच्या हद्दीला लागून असल्याने त्याच प्रमाणे मोकळे रान टेकड्या यामुळे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार या भागात असतो. मात्र यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. फेब्रुवारी महिन्यात देखील या भागातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

हेही वाचा: गुजरातच्या ठगबाजाकडून जळगावच्या व्यापाऱ्याची फसवणूक

या बाबतीत भोरटेक येथील नुकसानग्रस्त शेतकरी अशोकराव देशमुख व अरुणाबाई देशमुख सह अनेक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याचा रीतसर पंचनामा देखील करण्यात आला होता. त्याचप्रमाणे जानेवारी २०२१ मध्ये देखील पिकांचे नुकसान झाले होते. त्याची तक्रार देखील देण्यात आली. मात्र या तक्रारीची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही. ना नुकसान भरपाई देण्यात आली. पुन्हा या भागातील अशोकराव देशमुख यांच्या शेतातील उभ्या कपाशी पिकांचे वन्यप्राण्यांनी नासधूस केल्याने या शेतकऱ्यांचे लागोपाठ तिसऱ्या वेळेस मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

''भोरटेक शिवारातील बरड भागातील शेतात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढल्याने गेल्या दोन वर्षांपासून मोठे नुकसान होत आहे. वेळोवेळी तक्रार देऊन पंचनामा केला आहे. मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळत नाही तर दुसरीकडे वन्यप्राण्यांचा उपद्रव थांबत नसल्याने परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मागे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ द्यावी व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा.'' - अशोक देशमुख, शेतकरी भोरटेक

हेही वाचा: जळगाव : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची एणगावात आत्महत्या

Web Title: Farmers Are In Trouble As Wild Animals Destroying Crops In Fields

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..