Crop Loan : पीककर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; बँकेचे काम कासवगतीने

 Loan
Loanesakal

Jalgaon News : विविध कार्यकारी सोसायटीचे पीककर्ज मिळण्यासाठी सोमवारी (ता. १५) जिल्हा बँकेत गर्दी झाली होती. त्यात नेट बंद झाल्याने शेतकऱ्यांना वेळेत रक्कम मिळत नव्हती. परिणामी, शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. (Farmers struggle to get crop loans from bank jalgaon news)

पेरणीची वेळ जवळ आली की शेतकरी विविध कार्यकारी सोसायट्यांमधून कर्ज घेत असतात. शेतकऱ्यांना पीककर्जाची रक्कम जिल्हा बँकेतून मिळते. एकाच वेळी जिल्हा बँकेवर भार पडू नये, यासाठी बँकेने शेतकऱ्यांना एटीएमसारखे किसान कार्ड दिले होते. काही कार्डाची मुदत मार्च २०२३ मध्येच संपली.

त्यामुळे त्याद्वारे पैसे निघत नाहीत. बँकेत आले तर किसान कार्ड दिले आहे. परिणामी, विड्रॉल स्लिपवर पैसे मिळत नाही. किसान कार्ड नवीन मागितले तर बँकेकडे कार्ड शिल्लक नाहीत. जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची एकच गर्दी उडत आहे. शेतकऱ्यांना बचत खाते आणि विविध कार्यकारी सोसायटी खात्याची अशा दोन स्लिप भरायला लावल्या जात आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Loan
New Sand Policy : ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने नवे वाळू धोरण संकटात

अनेक शेतकरी अशिक्षित असल्याने गोंधळ होत आहे. बँकेकडे आधीच कर्मचारी कमी, त्यात लग्नसराई यामुळे काही रजेवर आहेत. त्यात रक्कम देखील नसल्याचे समजते. त्यामुळे शेतकऱ्यांना चार, पाच दिवसांत या म्हणून सांगितले जात आहे. भर उन्हात ग्रामीण भागातून शेतकऱ्यांनाना दोन, तीन वेळा फिरावे लागत आहे.

शनिवार, रविवार सुटी असल्याने सोमवारी बँकेत एकच गर्दी झाली होती. त्यात नेट बंद पडल्याने प्रक्रिया थांबल्याने शेतकरी त्रस्त झाले होते.

शुक्रवारी स्लिप भरून दिलेल्या शेतकऱ्यांच्या रकमा सोमवारी जमा केल्या जात होत्या. जिल्हा बँकेने जादा कर्मचारी देऊन शेतकऱ्याना वेळेवर पैसे देण्याची मागणी होत आहे. तसेच किसान कार्ड नूतनीकरण अथवा नवीन कार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

 Loan
Jalgaon News : अवाजवी वसुलीमुळे व्यापारी धडकले पालिकेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com