Jalgaon : नराधम बापाकडून पेाटच्या मुलीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raped on girl

Jalgaon : नराधम बापाकडून पेाटच्या मुलीवर अत्याचार

जळगाव : सावत्र आई बाळंतपणासाठी माहेरी गेल्याची संधी साधत नराधम पित्याने पोटच्या १७ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार (Rape) करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (father raped his own daughter Jalgaon Crime news)

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील एका तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी ही सावत्र आई, वडील, आजी, आजोबा आणि लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. सहा महिन्यांपूर्वी मुलीची सावत्र आई ही गर्भवती असल्याने ती तिच्या माहेरी गेलेली होती. तर पिडीत मुलीचे आजी व आजोबा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी अहमदनगरला गेले होते. घरी मुलगी, तिचा लहान भाऊ आणि तिचे वडील असे तिघेच जण होते. एके दिवशी रात्री तिघांनी जेवण केल्यानंतर झोपले. पिडीता गाढ झोपेत असताना तिच्या बापाने तोंड दाबत तिच्यावर अत्याचार केला. घरी कोणीही नसल्याने त्याने वारंवार दररोज असाच अत्याचार या मुलीवर केला. पिडीतेची आजी घरी आल्यावर तिने घडला प्रकार आजीला सांगितला. त्यावेळी पिडीत मुलीच्या आजीने नराधम बापावर घडलेल्या प्रकाराबाबत संताप करत भांडणही केले होते.

हेही वाचा: Nashik : शहरातून 9 गुंडांची तडीपारी

अन्‌ धक्काच बसला...

गेल्या महिन्यात मुलीला मासिक पाळी आली नाही म्हणून तिची आजी ही पिडीतेला घेवून पाचोरा येथील खासगी रूग्णालयात गेली. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पिडीत मुलीसह तिच्या आजीने जळगाव गाठले, त्यानंतर हा प्रकार जिल्हापेठ पोलीसांना रविवारी (ता. ३) कळल्यानंतर त्यांनी धाव घेतली. बालकल्याण समितीचे पत्र आणि पिडीत मुलीच्या जबाबावरून सरकारी फिर्यादी म्हणून पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर यांच्या फिर्यादीवरून नराधम बापावर सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

हेही वाचा: नाशिक : ट्रॅक्टरखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यु

Web Title: Father Raped His Own Daughter Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..