Jalgaon : बनावट कागदपत्राद्वारे स्टेट बँकेला चुना

Fake Documents
Fake Documentsesakal

जळगाव : सामान्य नोकरदाराला कर्ज (Loan) घेण्यासाठी नको-नको त्या अटी पूर्ण कराव्या लागतात. गरजवंताला सळो की, पळो करून ठेवणारे नियम लादले जातात. मात्र, एका भुरट्याने सर्व नियमांच्या अडी-अडचणी व अडथळे लिलया पार करून चक्क स्टेट बँकेच्या (SBI) मुख्य शाखेलाच सात लाखांचा चुना लावला आहे. (faud through fake documents with State Bank jalgaon crime news)

शहरातील गायत्रीनगरात राहणारा पवन अमरनाथ मिश्रा याने बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवून स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत कर्जप्रकरण टाकले होते. बँकेने सर्व कागदपत्रांची पळताळणी करून मिश्रा याला ७.०६ लाखांचे कर्ज मंजूर करून ते ३ फेब्रुवारीला अदा केले. बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर कर्जाच्या हप्त्याच्या तारखा सुरू झाल्या. मात्र, कर्जाचे हप्तेच भरले जात नसल्याने बँकेतून संबंधित ग्राहकाला संपर्क करण्यात आला, तर मोबाईल बंद येत होता. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी घर गाठून चौकशी केली, तर घर बंद होते. अखेर त्याची माहिती घेतली असता, तो अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. याबाबत बँक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविले. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेचे व्यवस्थापक सिसीर रघुनाथ पटनाईक (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिसांत पवन अमरनाथ मिश्रा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार तपास करीत आहेत.

नियोजनबद्ध फसवणूक

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे पवन मिश्रा याने त्याच्या नावाने खोटे दस्तऐवज तयार केले. खोटे दस्तऐवज खरे असल्याचे भासवून त्याने बँकेत कर्जप्रकरण टाकले. ते मंजूर करून घेतले. पैसा हातात पडल्यावर त्याने घरदार सोडून पळ काढला. त्याने इतरही बँकाची फसवणूक केली असल्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.

Fake Documents
नवीन शाहीमार्गावर झोपड्यांच्या अतिक्रमणात वाढ

दोषी कोण?

ऐरवी एखाद्या कर्ज प्रकरणात ग्राहकाला शंभर नियमांच्या चाळणीतून गाळून अटी-शर्तींनी घायाळ करणाऱ्या बँकाच्या अधिकाऱ्यांनी पवनकुमार मिश्रा याच्या दस्तऐवजांची तपासणी नेमकी कोणी केली? ज्याने केली त्याने वरिष्ठांचा सल्ला घेतला असावा आदी प्रश्नांसह खोटे दस्तऐवजांची तपासणी केल्यावरच नेमक काय ते ठरवता येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Fake Documents
महाऊर्जा नोंदणीकृत 418 मेगावॉट प्रकल्प : सरकारची वर्षाची मुदतवाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com