
जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी जिल्हा रुग्णालयाला दिले आहेत.
जळगाव : भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू विभागात लागलेल्या आगीत दहा बालकांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी जिल्हा रुग्णालयाला दिले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांनी तीन संस्थांना असे ऑडिट करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आवश्य वाचा- चक्क आयुक्तांना मोकाट कुत्र्यांची दिली भेट; कोणी केले असे ? वाचा सविस्तर !
नगर येथील ओम साई फायर सर्व्हिसेस, नाशिक येथील ज्योती फायर इंजिनिअर्स, शिरपूर (जि. धुळे) येथील फायर टेक सोल्यूशन सर्व्हिसेस यांना रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट करून देण्याविषयी सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील असे आहे रुग्णालये
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चोपडा उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय, जामनेर उपजिल्हा रुग्णालय, बोदवड ग्रामीण रुग्णालय, वरणगाव ग्रामीण रुग्णालय, यावल ग्रामीण रुग्णालय, न्हावी ग्रामीण रुग्णालय, रावेर ग्रामीण रुग्णालय, पहूर ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय, मेहूणबारे ग्रामीण रुग्णालय, भडगाव ग्रामीण रुग्णालय, पाचोरा ग्रामीण रुग्णालय, पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालय, अमळनेर ग्रामीण रुग्णालय, अमळगाव ग्रामीण रुग्णालय, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, सावदा ग्रामीण रुग्णालय, पारोळा कुटीर रुग्णालय, भुसावळ ट्रॉमा केअर सेंटरचे फायर ऑडिट करण्यास सांगण्यात आले आहे.
आवर्जून वाचा- पोलिसांना सांगतो का, आता घे म्हणत चेहऱ्यावर 'सपासप' केले वार
त्रुटीवरून उपायोजना करू
फायर ऑडिट करून अहवालाच्या त्रुटीच्या अनुषंगाने उपचारात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
संपादन- भूषण श्रीखंडे