Jalgaon News : मोहन टाकीजजवळ दोन घरांना आग; 2 कुटुंबांच्या संसारोपयोगी वस्तुंची राख! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

materials consumed by fire In second photo Firefighters fighting  fire

Jalgaon News : मोहन टाकीजजवळ दोन घरांना आग; 2 कुटुंबांच्या संसारोपयोगी वस्तुंची राख!

जळगाव : येथील जळगाव- असोदा रस्त्यावरील मोहन टाकीजसमोर शुक्रवारी (ता. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन घरांना लागलेल्या आगी(Fire) दोन्ही घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले. (fire broke out in 2 houses household materials in both houses were destroyed jalgaon news)

दोन्ही घरे लाकडी पार्टीशनची असल्याने आगीने त्वरित पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ जाऊन आग आटोक्यात आणली, अन्यथा इतर घरांनीही पेट घेतला असता.

शहरातील असोदा रोडवरील मोहन टॉकीजजवळ सुमन ओतारी, पमाबाई ओतारी यांची शेजारी शेजारी लाकडी पाट्यांचे पार्टेशनचे घरे आहेत. नेहमीप्रमाणे दोन्ही कुटुंबातील सदस्य कामासाठी शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घरातून गेले होते. साडेनऊच्या सुमारास पार्टेशन घराच्या पाठी मागे असलेल्या लोखंडी चुलीत जळती राख असल्याने अचानकपणे पार्टेशनच्या एका आग लागली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

घरातून धूर निघत असल्याचे एका ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने पाहणी केली असता, घराच्या मागच्या बाजूने दोन्ही घरांना मोठी आग लागली होता. स्थानिक नागरिकांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली.

आगीत दोन्ही घरातील संसारोपयोगी वस्तू खाक झाल्या असून, शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी दोन्ही कुटुंबाने केली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधीक्षक श्रीकांत बारी, उपअग्निशमन अधिकारी सुनील मोरे, चालक युसूफ पटेल, कर्मचारी पन्नालाल सोनवणे, नितीन बारी, भारत बारी, गंगाधर कोळी यांनी सहकार्य केले.

लांडोरखोरी टेकडीवर आग

येथील रायसोनी नगरापुढील लांडोरखोरी टेकडी परिसरातील गवताला गुरुवारी (ता. २३) सायंकाळी अचानक आग लागली. याबाबत जैन इरिगेशनचे सिक्युरिटी अधिकारी इंगळे यांनी अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाच्या बंबांनी तातडीने जाऊन आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. या परिसरात जंगल आहे. आगीचा वणवा आणखी पेटला असता.